Marmik
Hingoli live क्राईम

अट्टल दरोडेखोर जेरबंद; देशी बनावटीचे पिस्टल, 6 जिवंत काडतूस जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल दरोडेखोरास जेरबंद करून त्याच्या ताब्यातून देशी बनवती चे पिस्टल व 6 जीवंत काडतूस जप्त केले आहे.

हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. या अनुषंगाने वेळोवेळी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येत आहे.

3 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक वसमत भागात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील हयातनगर या गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चांदु सुग्रीव जाधव (वय 35 वर्षे रा. हयातनगर तालुका वसमत जिल्हा हिंगोली) याने दोन दिवसापूर्वीच पिस्टल व सहा जिवंत काडतूस खरेदी केले आहे.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने चांदु सुग्रीव जाधव यास हयातनगर येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असता त्याने दोन दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश मधून 55 हजार रुपयाला एक पिस्टल व सहा जिवंत काडतूस खरेदी करून आणल्याचे सांगितले व पोलिसांना काढून दिले.

आरोपी चांदु सुग्रीव जाधव याची अधिक विचारपूस केली असता त्याच्यावर यापूर्वी पूर्णा पोलीस ठाणे येथे एक दरोडेखोरीचा गुन्हा तसेच नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाणे येथे घरपोडीचे पाच गुन्हे व हिंगोली जिल्ह्यात अनेक चोरीचे गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय यंत्रणेमार्फत सदर आरोपी पिस्टल खरेदी करून आणताच वेळीच ताब्यात घेऊन पिस्टल व जिवंत काढतूस जप्त केल्याने भविष्यात होणारी एखादी मोठी जीवितहानी टळली आहे.

हिंगोली जिल्ह्यात पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, गणेश लेकुळे यांनी केली. सदरील घटनेचा अधिक तपास हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे हे करत आहेत.

Related posts

संत नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोली येथे भक्तिभावा ने स्वागत

Santosh Awchar

छत्रपती संभाजी नगर विभागीय वन अधिकारी कल्पना टेमगिरे यांची हिंगोली येथे सदिच्छा भेट

Santosh Awchar

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Gajanan Jogdand

Leave a Comment