मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर व इतर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी दरोडा व खुनाचे गुन्हे करणारा सराईत व अट्टल दरोडेखोरास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
कैलास रमेश शिंदे राहणार कोहिनूर कॉलनी कवठा रोड वसमत जिल्हा हिंगोली असे या अट्टल दरोडेखोराचे नाव असून मागील बऱ्याच कालावधीपासून तो चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व खुनाचे गुन्हे करून फरार होता त्याचा शोध घेऊन देखील तो पोलिसांना हुलकावणी देत होता. सदर आरोपीने नांदेड व लातूर जिल्ह्यात देखील गंभीर स्वरूपाचे बोलणे केले असल्याने नांदेड व लातूर जिल्ह्यातील पोलीस पथक देखील त्याच्या मागावर होते, मात्र तो पोलिसांना हुलकावणी देत होता व मिळून येत नव्हता.
नांदेड पोलीस उप महानिरीक्षक यांनी सदर आरोपी नामे कैलाश शिंदे यास अटक करण्यात आली. हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर येथील पोलीस अधीक्षक यांना आदेशित करून योग्य त्या सूचना दिल्या होत्या.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्यानेच रुजू झालेले जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अट्टल दरोडेखोर कैलास रमेश शिंदे याचा कसोशीने शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांना योग्य त्या सूचना दिल्या व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भगवान आडे, नितीन गोरे, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, सुमित टाले, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांनी सदरील आरोपीची योग्य ती माहिती घेऊन आरोपी हा बोर्ड मार्ग वसमत कडे स्विफ्ट डिझायर कारणे जाणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली.
यावरून वरील पथकाने बोलडा शिवारात सापळा रचून अत्यंत शिताफीने अट्टल दरोडेखोर कैलास रमेश शिंदे हा जात असलेल्या वाहनास अडवून ताब्यात घेतले व त्याच्याकडून 6 एम एम पिस्टल, दोन जिवंत काढतूस, खंजीर व स्विफ्ट डिझायर कार असा एकूण तीन लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा यासह भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कैलास शिंदे याने हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात चोरी, घरफोडी जबरी, चोरी दरोडा व खुणाचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाही हिंगोली जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भगवान आडे, नितीन गोरे, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, सुमित टाले, तुषार ठाकरे, आकाश टापरे यांनी केली.