मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – औंढा नागनाथ येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीस हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून दोन लाख 89 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हिंगोली जिल्ह्यात होणारे चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालून सदर गुन्हे करणाऱ्या आरोपी व त्यांच्या टोळीला पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी काळूराम उर्फ काळू पि. बाळू काळे (28 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार सुरज मोहल्ला सेलू, तालुका सेलू, जिल्हा परभणी) हा त्याच्या घरातून अतिशय सीताफेने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल घेतल्याची कबुली दिली.
सदर आरोपीकडून तपासा दरम्यान या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने यामध्ये झुंबर, कानातील बाळी, अंगठी, ओम, लॉकेट, शॉर्ट गंठण, कान चैन, जोड सोन्याचे मनी असा ऐकून दोन लाख 89 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, शेख शकील, भगवान आडे, सुनील अंभोरे, नितीन गोरे, पारू कुडमेथे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकूर, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर कातवडे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, शंकर ठोंबरे, शेख जावेद, प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.