Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

पूरस्थिती : कुरुंदा व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरू

हिंगोली : संतोष अवचार 

जिल्ह्यात 8 जुलै रोजी  रात्रभर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यातील  आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा आणि परिसरातील गावांतील 400 ते 450 घरांमध्ये  सुमारे पाच फूट पाणी शिरल्याचे कळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत कार्य करुन संबंधित ग्रामस्थांना सुक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पावळकर यांनी येथे दिली .             

या पूर पतिस्थितीची  माहिती मिळताच पहाटे 4.50 वाजता उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. अद्याप कोणतीही जिवित हानी झालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार 50 ते 60 जनावरे, 30 ते 35 शेळ्या दगावल्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित गावातील पाणी आता पूर्णपणे ओसरले आहे.

        तसेच वसमत तालुक्यातील टाकळगाव येथील दोन शेतकरी, इंजन गाव येथील दोन शेतकरी अशा एकूण चार शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या सहायाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच रुंज गावातील शेतात अडकलेल्या एका नागरिकांस सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

        पूरग्रस्त गावातील घराच्या आणि शेतीच्या नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. या नुकसानग्रस्त भागाची मी स्वतः पाहणी केली असून माझ्या सोबत   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने होते असेही श्री .पापळकर  यांनी सांगितले आहे .                

जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली तेव्हा मोठ्या प्रमाणात  शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या  पूरग्रस्त गावात अद्याप मदत कार्य सुरु असून या मदत कार्यात माझे संपूर्ण लक्ष आहे,असेही श्री .पापळकर यांनी सांगितले आहे.

पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना सुरक्षीत स्थळी हलवून त्यांच्या राहण्याची ,जेवण्याची , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोबाईलवरुन जिल्हाधिकारी यांना दिले .  

Related posts

मी आणि माझं सरकार 24तास शेतकऱ्यांसोबत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना भावनिक साद; पत्र व्हायरल

Gajanan Jogdand

हिंगोली पोलीस कवायत मैदानावरील किल्ला, पोलीस कॅन्टीन व नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन

Santosh Awchar

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment