मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरात 29 जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. यावेळी रहदारीस अडथळा होण्याची शक्यता असल्याने व रहदारीस कोणताही अडथळा निर्माण न होता तसेच सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार हिंगोली शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे.
यावेळी औंढा नागनाथ जाणारे रोडवरील मुख्य ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
त्यामुळे रहदारीस अडथळा होण्याची शक्यता असल्याने वरदारी कोणताही अडथळा निर्माण न होता तसेच सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्याकामी हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांवर 29 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत हिंगोली शहरातील वाहतुकीच्या नियमासंबंधी अधिसूचना काढली आहे.
त्यात सदर कालावधीत हिंगोली शहरातील काही भागातील वाहतूक पूर्णपणे बंद तर वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग
नांदेड नाका – एनटीसी गेट – बस स्टॅन्ड पूर्वेकडील गेट 52 खोली रोड संभाजी शाळेजवळील रोड येथून ईदगाह कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
कयाधू नदीकडून नांदेड नाकाकडे येणारा रोड वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद राहील.
जड वाहनास बंद असलेले मार्ग
नरसीटी पॉईंट, खटकाळी बायपास, अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनास प्रवेश बंद राहील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
हिंगोली शहरातून औंढा नागनाथ, सेनगाव कडे जाण्यासाठी वाहतुकीसाठी इंदिरा चौक – गांधी चौक – फुलमंडी – गोदावरी कॉर्नर – मेहराज उलुम मस्जिद – खाकी बाबा चौक – कब्रस्तान – कयाधू नदी पूल – नरसिटी पॉईंट पासून पुढे.
हिंगोली शहरातून नांदेड कडे जाण्यासाठी इंदिरा चौक – नांदेड नाका – रेल्वे उड्डाणपूल – खटकाळी बायपास – उमरापाटीपासून पुढे.
जड वाहतूक वाशिम कडून नांदेड कडे जाण्यासाठी डेंटल कॉलेज पासून नवीन एन एच १६१ महामार्गाने नांदेड कडे.
नरसी कडून येणारी व नांदेड कडे जाणारी जड वाहतूक नरसी नामदेव टी पॉइंट वरून पुढे.
औंढा नागनाथ मार्गे हिंगोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर – चौक गांधी – चौक इंदिरा चौक – नांदेड नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू राहील.
वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून 29 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंत वरील प्रमाणे वाहतूक मार्गात केलेल्या बदलाप्रमाणे सूचना व आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.