Marmik
Hingoli live क्राईम

दरोडा टाकायच्या आधीच आरोपींची उचल बांगडी! एक कार, दरोडा टाकण्याच्या साहित्यासह चार लाख 58 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील इडोळी पॉईंटवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींची हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडा टाकण्याआधी उचल बांगडी केली आहे. या आरोपींच्या ताब्यात एक कार, 6 मोबाईल व दरोडा टाकण्याच्या साहित्यासह 4 लाख 58 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 सप्टेंबर रोजी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गुन्हेगार तपासणी व अवैध धंद्यावर कार्यवाहीसाठी पेट्रोलिंग करताना पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ईडोळी येथील टी‐पॉइंटवर पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही इसम संशयितरित्या बसलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

यावरून दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता कार क्रमांक एमएच २० डीजी 1407 मधील इसम पळून गेले व कार मध्ये सय्यद जुनेद सय्यद कदीर (वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा. ससेवाडी हिंगोली), वाजिदखा दौलतखा पठाण (वय 28 वर्ष व्यवसाय मजुरी रा. समता नगर सेनगाव) हे मिळून आले.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी सय्यद जुनेद सय्यद कदीर याच्यातून विविध कंपन्यांचे एकूण सहा मोबाईल व कार मध्ये दरोडा टाकण्यासाठी उपयोगात येणारे साहित्य मिळून आले.

त्याचे वर्णन पुढील प्रमाणे. अंदाजे किंमत 200 रुपयाची जुनी वापरलेली एक लोखंडी पकड रबरी मूठ, 500 रुपयाची जुनी वापरलेली एक 11 इंच पाते व 4 इंच काळ्या रंगाची मूठ, असा एकूण 15 इंच लांबीचा काळ्या रंगाचा म्यान मध्ये असलेला लोखंडी खंजीर.

दोन हजार रुपये किमतीची जुनी वापरलेली एक 20 इंच पाते व 6 इंच लोखंडी मूठ असे एकूण 26 इंच लांबीची लोखंडी तलवार, एका पांढऱ्या रंगाची सुती दोरी (नऊ फूट लांब असलेली), 50 रुपयाची एक प्लास्टिक बंदमध्ये मिरची पावडर.

अंदाजे 100 ग्रॅम अंदाजे किंमत 1000 किमतीचा जुना वापरता एक निळ्या रंगाचा आयपीएल कंपनीचा साधा मोबाईल, अंदाजे किंमत एक 5 हजार रुपयाचा जुना वापरता सोनेरी रंगाचा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल.

अंदाजे किंमत एक 10 हजार रुपयाचा जुना वापरता सोनेरी रंगाचा जिओ कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल एक 15 हजार रुपयाचा जुना वापरता निळसर रंगाचा शाओमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, अंदाजे किंमत 15 हजार रुपयाचा जुना वापरता एक मोरपंखी रंगाचा ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल.

अंदाजे किंमत 10 हजार रुपयांचा जुना वापरता एक ग्रे रंगाचा रियलमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, एक चार लाख रुपयाची पांढऱ्या रंगाची टाटा विस्टा कंपनीची कार (क्रमांक दीजी 20 एम एच १४०७) वरील नमूद मोबाईल, कार व दरोडा टाकण्याचे साहित्य असे एकूण चार लाख 58 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

यातील आरोपी सय्यद जुनेद सय्यद कदीर याच्यावर हिंगोली व परभणी जिल्ह्यात यापूर्वी जबरी चोरी, चोरी, शरीराविरुद्धचे गंभीर असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत.

नमूद दोन आरोपी व पोलिसांना पाहून पळून गेलेले इस्तेखार जुल्फेखार पठाण (रा. बावन खोली हिंगोली), शेख मोहसीन शेख युसुफ (रा. तलाबकट्टा हिंगोली), शेख अरयाज शेख आयुब (रा. गोरेगाव) यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये तसेच भारतीय हत्यार कायदा 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच नमूद आरोपींना ताब्यात घेतल्याने भविष्यात होणाऱ्या दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्याला आळा बसला आहे.

ही कार्यवाही हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, महादू शिंदे, आजम प्यारेवाले, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर साबळे, शेख जावेद व दीपक पाटील सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.

Related posts

जिल्ह्यातील साठवण तलाव ओव्हरफ्लो

Santosh Awchar

पुसेगाव येथील आणखी दोघेजण दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

विवेक ठरला नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र; नातवाच्या सत्काराने आजोबा चे डोळे पानावले

Jagan

Leave a Comment