मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
सेनगाव – विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळशाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्यावर आज 25 जुलै रोजी वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यानिमित्त विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे विद्यार्थ्यांसमवेत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोळसा संस्थापक अध्यक्ष भास्करराव बेंगाळ व त्यांचे सुपुत्र विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक बेंगाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर रिसोड येथील माजी नगरसेवक फयाज अहेमद, नगरसेवक पवनभाऊ चितरका, गजाननभाऊ निखाते, किसनराव नागटिळक, विद्यानिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. शिंदे, प्रकाशराव शिंदे मुख्याध्यापक विनोद सरकटे, शिक्षक कसाब आदी उपस्थित होते.
यावेळी भास्करराव बेंगाळ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी रिसोड येथील मित्रमंडळांनी भास्करराव बेंगाळ यांचा जंगी सत्कार केला.
तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त भास्करराव बेंगाळ यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.