Marmik
Hingoli live Love हिंगोली News

खबरदार ! दहा रुपयांचे नाणे नाकाराल तर… गुन्हा दाखल करण्याचा हिंगोली जिल्हा प्रशासनाचा इशारा  

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – भारतीय चलनात भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेले दहा (10) रुपयांचे नाणे काही ठिकाणी स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. अशा प्रकारे नाणे स्वीकारणे हे बंधनकारक असून भारतीय रिझच्ळ बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल होऊन तो शिक्षेस पात्र ठरु शकतो, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारे चलनातील नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीविरुध्द भादंवि कलम 124 नुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या दिशानिर्देशानुसार रिझर्व्ह बँकेने जारी केलेले चलन स्वीकारण्यास कुणीही नकार देऊ शकत नाही. बँका, व्यापारी, व्यक्ती कायदेशीर चलन स्वीकारण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई होऊ शकते. दहा रुपयांचे नाणे हे राष्ट्रीय चलन आहे.

भारत सरकारने वाहकाला चलनाचे मूल्य देण्याचे वचन दिल्याने ते नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांविरुध्द भादंवि कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद

गुन्हा दाखल करण्यासाठी नाणे नाकारणाऱ्या व्यक्तीकडून लेखी स्वरुपात नाणे नाकारण्याचे कारण घ्यावे. त्याचा तपशील स्थानिक पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करतील. या गुन्ह्यात दंडासह तीन वर्षाचा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशात म्हटले आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील बँका, व्यापारी, नागरिकांनी दहा रुपयाचे नाणे स्वीकारावेत अन्यथा नाणे नाकारल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.

Related posts

लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवून स्पेशल कोर्टाची स्थापना करा, सेनगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाची राष्ट्रपतींकडे मागणी

Gajanan Jogdand

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा पोलीस दीदी, पोलीस काका उपक्रम; 450 शाळा व महाविद्यालयात बसविल्या तक्रारपेटी!

Santosh Awchar

आरोग्य क्षेत्रात हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल! पाच आरोग्य संस्थांना राज्य शासनाचा कायाकल्प पुरस्कार

Santosh Awchar

Leave a Comment