Marmik
दर्पण

“भारत माता पूजन;एक संस्कार…”

विशाल वसंतराव मुळे – आजेगावकर

तसं आपल्या आईचे पूजन एखाद्या मुलाने करणे हे काही सार्वजनिक करण्याचा विषय नाही. आपल्या आई सोबत फोटो काढून तो उजागर करणे हा ही कौतुकाचा विषय नाही. आपल्या आईची सेवा करणे हे आपण मुलगा म्हणून कर्तव्य आहे. नव्हे ती आपली साधना आहे. आपण सर्व भारतीय हे आपल्या ह्या परम पवित्र जन्म भूमीला देखील आईच मानतो. प्रभुराम ह्यांनी देखील “जननी जन्मभुमिश्च स्वर्गादपिगरीयसी” म्हणजे जन्म देणारी आई आणि जन्म भूमी स्वर्ग समान आहे, असं म्हणाले आहे. आणि आपण सर्व सर्व भारत मातेचे पुत्र आहोत असं विष्णू पुराणात म्हटले आहे. ह्याच न्यायाने ही भारत भूमी आपली आई आहे आणि पूजक आहे. ज्या देशात आपण जन्म घेतलाय, ज्या संस्कृतीचे आपण संवाहक आहोत, त्याच्या प्रती स्वाभिमान प्रगट करणे हे आपले कर्तव्य आहे..

खरं पाहता हे नैसर्गिक आहे.. मी अगोदरच सांगितल्या प्रमाणे हे आपलं कर्तव्य आहे हे सार्वजनिक करण्याची गरज नाही. देशभक्ती प्रगट करणे हा प्रसंसेचा विषय नाही, अत्यंत स्वाभाविक असं आपलं ते कर्तव्य आहे. पण मध्यल्या काळात आणि आजही भारतातील आणि भारता बाहेरील दुष्ट शक्ती ह्या भारत मातेला केवळ जमिनीचा एक तुकडा मानणारे आहेत. भारताला भारत म्हणायचं नाही, इतकचं नाही तर काही ठिकाणी तिरंगा सुद्धा फडकावयला विरोध होता. आणि म्हणूनच हा केवळ जमिनीचा तुकडा नाही तर ही आमची माता आहे, ती आम्हाला सदैव वंदनीय आहे हाच ह्या भारत माता पूजन मागचा उद्देश आहे…एका ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी म्हटलेल आहे “इथून पुढे काही शतकं, भारत माताच ही भारताची एकमेव उपास्य देवता मानली पाहिजे”. स्वामी विवेकानंदांची दूरदृष्टी होती. आणि ते बरोबरही होतं. कारण भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. इथल्या प्रथा परंपरा, पूजा पद्धती, हे सर्व वेगळ आहे. आपल्याला एकसंघ जोडून ठेवणारी एकमेव आहे ती आपली भारतीय संस्कृती. आपल्या ह्याच जोरावर आपण आजपर्यंत विश्वाला दिशा दिलेली आहे. भारत माता पूजन करण्यामागे आपल्या संस्कृती पूजनाचा एक बिंदू आहे. आपली संस्कृती आपला अभिमान असावा असा उद्दात हेतू ह्या मागचा आहे. आपल्या माते चरणी आपण समर्पित असावे, ह्याच धोरणांनी आपल्याला जागर रहावा त्यासाठी आपल्याला हे पूजन करायचं आहे. आणि आपण सर्व भारत मातेचे पुत्र आहोत, हाच भाव भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा असावा. त्या सर्वांनी, म्हणजे ज्यांच म्हणून ह्या भारत भूमीवर प्रेम आहे त्या सर्वांनी तिच्या प्रती कृतज्ञ असावं ह्याच भावनेने आपण भारत माते चरणी समर्पित झालं पाहिजे, तो आपल्या संस्कृतीचा भाग बनला पाहिजे…

प्राचीन परंपरा असणारा आमचा भारत हा केवळ जमिनीचा एक तुकडा नाहीये, ही भूमी स्वतंत्र करायला भगत सिंग पंजाबातून, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्रातून, सुखदेव उत्तर प्रदेशातून, चंद्रशेखर आझाद सारखा तरुण मध्यप्रदेशातून, ही भारत भूमी ही आमची माता अधिकतेने तेजस्वी व्हावी ह्या भावनेने कोणी कलकत्ता, कोणी कुंवर कौशल जन्म घेत असते. अनेक तरुणांनी ह्या भारत मातेला मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे. अनेक तरुणांचा नाहक बळी घेऊन इंग्रजानी आपल्याला सैल करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा ह्या देशात ह्या मातीसाठी अनेकांनी रक्त मासानी अभिषिक्त केलं आहे. अशा ह्या पवित्र भारत भूमीत तिरंग्याचा विरोध झाला, माता म्हणू नका असं म्हणायला धजावनारी मंडळी जन्माला आली होती, आजही काही आहेत. जमु-काश्मीरला स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्ष तिरंगा सहज फडकाविता येत नव्हता, खरं तर सहज पाहिजे होतं पण तसं होत नव्हत. त्यासाठी ह्या भारत मातेच्या पुत्रांनी जे जे करता येईल ते ते, तन, मन, धन, इतकचं नाही तर सर्वोच्य बलिदान देऊन त्यात बदल घडून आणला. हा बदल आज जर आपण विसरला तर भारताच्या पोटातले भारताचे दुश्मन, भारता बाहेरील भारताचे दुश्मन आजही आपल्या ह्या परम पवित्र भारत भूमीला नुकसान करण्याचा त्यांचं दुष्ट हेतू साध्य होणार नाही, तो होऊ नये ह्याच स्मरण आम्हाला राहील पाहिजे ह्याच हेतूने भारत माता पूजन आम्ही केलं पाहिजे, त्या नरविरांच स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे…

भारत हा केवळ संस्कृती पूजक आहे असं नाही, तो संस्कृती पूजक आहेच. पण ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे ते ते भारताने स्वीकारलं आहे. भारताचा गाभा श्रीमद् भगवद्गीता मध्ये सापडतो, पुढे त्याला ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसांपर्यंत पोचवले. तुकोबररायादि संतांनी ह्याला अजून पुढे नेने. रामायण महाभारतातील पात्रानी आणि विचारांनी ह्याला वेगळा दर्जा तर दिलाच शिवाय विचारांचं एक मोठं अधिष्ठान दिलं. भारताच्या पुराणानी त्याला अधिक समृद्ध केलं. प्रत्येक पुराणातील स्मृती वेगळी वेगळी असताना, त्या ही भारताच्या माणसांनी स्वीकारलं. सहाशेच्यावर संस्थान असणारा हा भारत राष्ट्र प्रचंड समृद्ध होतं. विदेशातील एखादा नेता आला तर “आपण एका राष्ट्रात आलो की अनेक राष्ट्राच्या समूहात आलो” असं वाटतं असं राष्ट्र असताना आजही भारताचे संविधान ह्या सर्वांना जोडणारा समान धागा आहे. आजही ह्याच संविधानाच्या छत्राखाली सामान्य नागरिक ते देशातला पंतप्रधान सर्व एकाच धाग्यात आहेत. जशी भारताची संस्कृती एक आहे तसंच ह्या संविधानाने सामान्य नागरिक ते पंतप्रधान ह्यांना समान मतदानाचा अधिकार देऊन ह्या देशाची कीर्ती अजून वाढविली. भारतीय संविधानाने जगाला दिपऊन जाईल अशी धारणा दिली…

भारताचा स्वाभिमान, भारताची स्वर्णीम संस्कृती, हीचा जय घोष संपूर्ण जगतात होत आहे. आपल्या ह्या भारतीय संस्कृतीत उपासनेच्या अनेक कल्पना सांगितल्या आहेत. अनेक प्रकारे त्याला समजून सांगितले आहे. पूजा पद्धती वेगळ्या आहेत. पण भारतीय संस्कृतीत हे सर्व असताना आपल्याला जे आपलं मुख्य गंतव्य आहे ते विसरून चालत नाही. आद्य शंकराचार्य ह्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक चर्चा केल्या, पूर्णं भारताची परिक्रमा केली, जेवढे काही संप्रदाय आहेत त्यांच्याशी चर्चा करून पराभूत केलं. ज्यांना पराभूत केलं त्यांना परत सोबतही घेतलं, त्यांना सोबत घेणं का आवश्यक होतं, कारण की ते सर्व आपसात वाद करत होते, आपापल्या मार्गावरून वाद करत होते. ते हे विसरले होते, आपल्याला जिथे पोचायचं आहे त्याच सम्यक ज्ञान देण्यासाठी आपला संप्रदाय आहे. शंकराचार्यांनी त्यांना त्यांचं गंतव्य लक्षात आणून देण्यासाठी परत सोबत घेतलं आणि आपलं मुख्य एकमेव गंतव्य काय आहे हे सांगितलं.

आपल्याला ह्या भारत माता पूजनाच्या हेतूने ह्या उद्देशामागे आपले एकमेव गंतव्य ह्या भारत मातेची सेवा आहे हे आपण लक्षात घ्यावं, आणि तेच सर्वांना लक्षात आणून द्यावं हाच उद्देश आहे. स्वतंत्र पूर्व काळ सोडा, स्वातंत्र्या नंतरही आणि अगदी पाच सात वर्षांपूर्वी संसदेत एक खासदार म्हणाला होता, मी “भारत माता की जय” म्हणणार नाही. आजही त्यांना असं म्हणायला त्यांचं काळीज धजावत. त्याच कारण आहे कारण आम्ही आमचं मूलतत्व विसरत चाललो आहोत, आमच्यातील एकोपा आणि आपलं ध्येय विसरत चाललो आहोत, ह्या भारत माता पूजनाने एक ध्येय एक निष्ठा आणि एकमेव उपास्य देवता ही भारत माता ह्याची जाणीव आपल्या सर्वांना व्हावी हाच उद्देश आहे.. आपण सर्व जण तेच करू ही आशा आहे…

(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)

Related posts

‘संकल्प पत्र’; हा आचारसंहितेचा भंग नव्हे काय?

Gajanan Jogdand

भिमान देश उचलला, पेनाच्या टोकावर…

Mule

प्रिय दाजीस…!

Gajanan Jogdand

Leave a Comment