मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथून नांदेड जाणाऱ्या महामार्गावरील वसमत शहराच्या अलीकडे भेंडेगाव पाटी परिसरातील रेल्वे फटका जवळील महामार्गावर दोन ते तीन फूट खोल खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले आहे. प्रवाशांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिंगोली येथून औंढा नागनाथ – वसमत व पुढे नांदेड जाणाऱ्या महामार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र वसमत शहरापासून अलीकडे भेंडेगाव पाटी परिसरातील रेल्वे फाटका जवळ महामार्गाचे काम करण्यात आले नाही.
सध्या पावसाचे दिवस असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे दोन ते तीन फूट खाली खोल असे मोठे मोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून या ठिकाणी तलावाचे स्वरूप येऊ लागले आहे. खड्डे खाली दोन ते तीन फूट असल्याने व त्यामध्ये पाणी साचल्याने या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही.
त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघात देखील घडत आहेत. या खड्ड्यांमध्ये अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणचे बांधकाम करा,वे अशी मागणी वाहनधारक, प्रवासी यांच्यातून होत आहे.