Marmik
Hingoli live क्राईम

गोरेगाव येथील दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारी, पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील गोरेगाव येथील सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर भूमिका घेत असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गोरेगाव येथील राहणारे सराईत गुन्हेगार यादव गोविंदराव गवळी (वय 50 वर्ष) भगवान यादवराव गवळी (वय 30 वर्षे, दोन्ही रा. गोरेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध एकूण तीन गुन्हे दाखल असून ते सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.

त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या आशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न होत आहे.

त्यामुळे पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिल्यावरून गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. आर. जाधव यांनी नमूद आरोपी विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग हिंगोली विवेकानंद वाखारे यांनी सविस्तर करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याकडे शिफारस केली होती.

यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वय नमूद दोन्ही आरोपींना आज पासून पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश काढले आहेत.

हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑलआऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

कोंबिंग ऑपरेशन : हिंगोली व कळमनुरी येथील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासणी

Santosh Awchar

कळमनुरी येथे लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक

Santosh Awchar

विशेष कोंबिंग ऑपरेशन: अनेकांची उचल बांगडी!

Santosh Awchar

Leave a Comment