Marmik
Hingoli live क्राईम

सेनगाव येथून दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सतत सराईतपणे गुन्हे करणाऱ्या सेनगाव येथे वास्तव्यास असलेल्या दोघांना हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.

डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज रोजी सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील सेनगाव सिनगी नागा येथे राहणारे सराईत गुन्हेगार अनिल पांडुरंग गीते (वय 26 वर्ष रा. सिनगी नागा ह.मु. लक्ष्मीनगर, सेनगाव, पुसेगाव ता. सेनगाव) आकाश उर्फ सावन नवनाथ जाधव (वय 24 वर्ष रा. सेनगाव, ता. सेनगाव जि. हिंगोली) यांच्या विरुद्ध सेनगाव पोलीस ठाणे येथे शरीराविरुद्ध एकूण दोन गुन्हे दाखल असून ते सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.

त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न होत आहे.

पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिल्यावरून सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.व्ही. भोईटे व पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांनी नमूद आरोपी विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वसमत किशोर कांबळे यांनी सविस्तर करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.

यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये नमूद दोन्ही आरोपींना आज पासून पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश काढले आहेत.

हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

उत्कृष्ट घरकुलाचे बांधकाम केल्याने रिधोरा येथील तिघांचा गौरव, साहित्य महागल्याने घरकुलाचा निधी वाढवून देण्याची गरज

Gajanan Jogdand

नियमित सकस आहार घेतल्यास कुपोषण दूर होते- डॉ.नामदेव कोरडे

Gajanan Jogdand

जप्त टिप्पर चोरीस गेल्याचे प्रकरण; मालकच निघाला चोर

Santosh Awchar

Leave a Comment