मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथील घेण्यात आलेली सरपंच पदाची निवडणूक ही मागणी करूनही गुप्त पद्धतीने घेण्यात न आल्याने सदरील पदाची निवड रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश हिंगोली जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.
सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथील अर्जदार शारदा जनार्दन डवाळे यांनी सदर सरपंच पदाचे मतदान गुप्त मतदान पद्धतीने घेण्याबाबत अर्ज केल्यानुसार सदर सरपंच पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली नाही.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 33 टीका-4 नुसार गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्याबाबत अध्यासी अधिकाऱ्याला गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत एखादा सदस्य अशा प्रकारची मागणी करत नाही जर अशा प्रकारची निवडणूक झाली तर ती अवैध ठरेल (जनेंद्र वि. राजेंद्र, १९९४ एस. आय. आर. (सु. को.)586, 587, 588) हा दाखला त्यांनी दिला.
सदस्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान व्हावे. अशी मागणी केल्यास मतदान गुप्त पद्धतीने झाले पाहिजे असे नियम 10 (2) मध्ये नमूद आहे.
त्यानुसार अर्जदार शारदा जनार्दन डव्हाळे यांनी गुप्त मतदान पद्धतीने घेण्याबाबत अर्ज दिला होता. त्यानंतरही आदिवासी अधिकारी यांनी ग्रामपंचायत उटी ब्रम्हचारी येथील सरपंच उपकरित पदाची निवडणूक मतदान पद्धतीने न घेता हात उंचावून घेतलेली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 33 (5) अन्वये सरपंच पदाची निवड रद्द करणे योग्य होईल या निष्कर्षा प्रत माझे मत झाल्यावर सदरील आदेश पारित करत आहे, असे या आदेशात जिल्हाधिकारी जितेंद्र बापकर यांनी म्हटले आहे.