मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील मोडी येथील एका शेतकऱ्याने त्याच्या तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली. सदरील गांजा हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जप्त केला. यावेळी 168 गांजाच्या झाडांसह 91 हजार 728 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याचा शोध घेऊन कार्यवाही करीत आहे.
दि. 25 / 10 /2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत उपविभागात अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मुडी येथील इसम नामे धुराजी उर्फ राजू शेषराव पडोळे (वय 35 रा. मुडी) याने स्वतःच्या तुरीच्या पिकामध्ये गांजाचे अंतर पीक घेतले आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली.
या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे व त्यांचे पथक मौजे मुडी शेतशिवारातील गट क्रमांक 125 मध्ये जाऊन पंचासह छापा मारला.
यावेळी सदर शेतामध्ये तुरीच्या ओळीमध्ये गांजाचे लहान-मोठे 168 झाडे /रोपे मिळून आली. सदर गांजाचे झाडे चे एकूण वजन 3.822 किलोग्रॅम (किमत अंदाजे 91 हजार 728 रुपये) चे मिळून आले.
सदर गांजाचे रोपे लावणारा आरोपी धुराजी उर्फ राजू शेषराव पडोळे रा. मुडी यांच्या विरोध पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक यामावार, पोलीस अंमलदार उपरे, गणेश लेकुळे ,आकाश टापरे ,नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे, भांगे, मपोह गिरी, तसेच नायब तहसीलदार विलास तेलंग, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी प्रवीण पांडे, कृषी सहाय्यक शेख अब्दुल रझाक यांच्या पथकाने केली आहे.