हिंगोली : संतोष अवचार
येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात 1 जुलै माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून वृक्षलागवड करून साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशिकिरण उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लवेश तांबे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अशोक भंगिरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश्वर कदम, कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे, जिल्हा कृषी अधिकारी पंकज राठोड जिल्हा कृषी अधिकारी उत्तम वाघमारे, मोहिम अधिकारी कामाजी ठोंबरे हे उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दराडे यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांनीही वृक्षारोपण यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी हे आवर्जून उपस्थित होते.