Marmik
Hingoli live

विद्यानिकेतन विद्यालयात शिक्षक दिन साजरा, इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी पार पाडले शालेय व्यवस्थापनाचे कार्य

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / शहर प्रतिनिधी :-

सेनगाव – तालुक्यातील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापनाचे कार्य पार पाडले.

विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोळसा येथे स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर 2023 या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच 5 सप्टेंबर या दिवशी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शालेय व्यवस्थापनाचे कार्य पार पाडले.

यावेळी शाळेची मुख्याध्यापिका म्हणून वैष्णवी रामकिसन तोंडे व उपमुख्यध्यापिका म्हणून नम्रता तानाजी चोपडे या विद्यार्थिनींनी काम बघीतले. इयत्ता दहावीच्या च्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्गाच्या व्यवस्थित तासिका घेतल्या व उत्तम प्रकारे शाळा चालविली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ, मुख्याध्यापक शिंदे आर .बी., मुख्याध्यापक व्हि. एस. सरकटे व पर्यवेक्षक कसाब पी.पी ,प्रा. प्रकाशराव पाटील, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक चोपडे जी.एस. व शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

कागदपत्र काढण्यासाठी हिंगोली तलाठी घालताहेत आडकाठी

Gajanan Jogdand

प्रजासत्ताक दिन : गोकुळ विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम

Gajanan Jogdand

उद्यापासून बारावीची परीक्षा; 14 हजार 449 विद्यार्थी लिहिणार पेपर, 5 भरारी पथक नियुक्त

Santosh Awchar

Leave a Comment