मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – येथे मागच्या महिन्यात 3 मोठे प्रकल्प येत आहेत, अशी चांगली बातमी आली. महाराष्ट्र शासन सोबत करारही झाला आहे. या तीन प्रकल्प मध्ये Toyato किर्लोस्कर मोटार सुमारे 25000 कोटी गुंतवणूक , तसेच जे एस डब्ल्यू कंपनी सुमारे 27500 कोटी आणि लुब्रिझोल कंपनी 2000 कोटी गुंतवणूक.करणार म्हणजेच सर्व मिळून 54,0000 पेक्षा जास्त गुंवणुक आणि 20000, पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. हे सर्व प्रकल्प 2027 पर्यंत सुरू होतील.
बिडकिन येथे DMIC ऑरिक सिटी येथे येत असून मराठवाडा विभाग आता कुठेतरी तरी चांगले दिवस येण्याची सुरवात झाली आहे.
पुढील काळात एक मोठे ऑटोमोबईल हब म्हणून छत्रपती संभाजी नगरची ओळख असेल. या ठिकाणी पर्यटन क्षेत्राला जास्त वाव मिळेल उद्योग ,व्यापार , हॉटेल इंडस्ट्री, शैक्षणिक स्थळ वाढेल ,बँकिंगचा बिजनेस वाढेल , ट्रान्सपोर्ट, टुरिझम, ट्रॅव्हल ,बिजनेस वाढेल, प्रत्येक क्षेत्रात व्यवसायाची संधी मिळणार आहे.
या सर्व प्रकल्प येथे घेऊन येण्यात ज्यांनी ज्यांनी अहोरात्र परिश्रम केले. त्यात CMIA चे अध्यक्ष अर्पित सावे अध्यक्ष दुष्यंत पाटील, उपध्यक्ष उत्सव माछर , अर्त्रवेश नंदावत, तसेच मासीयाचे अध्यक्ष अनिल पाटील उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड मनीष अग्रवाल ,सेक्रेटरी राजेंद्र चौधरी राजेश मांनधने यांचा औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने सत्कार करण्यात* *आला,आणि अभिनंदन” करण्याचा सोहळा काल आयोजित केला होता.
या सोहळ्याचे कार्यक्रमाध्यक्ष मनसे पवार ज्येष्ठ उद्योजक हे होते. तसेच मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपाल छाबडा तसेच महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल जी मालानी, प्रसिद्ध उद्योजक उमेश दशरथी ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, सीएमआयचे, माजी अध्यक्ष उद्योजक मुकुंद कुलकर्णी ,शिवप्रसाद जाजू , तन्सुख झांबड सतीश लोणीकर, अर्जुन गायके, हेमंत लांडगे, विजय जयस्वाल जगन्नाथ काळे, विकास सावजी जयंत देवळांकर , पंकज लोया निलेश सेठी लक्ष्मीनारायण राठी,सरदार हरिसिंग ,गुलाम हक्कानी ,चौधरी जी ,संभाजीनगर शहरातील सर्व औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष व सेक्रेटरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर स्वामी यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष कावळे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी झाली.