मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
औंढा नागनाथ – तालुक्यातील नंदगाव येथे केंद्रीय प्राथमिक शाळा सिद्धेश्वर अंतर्गत 23 जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
23 जानेवारी रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा सिद्धेश्वर अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन हिंगोली गटशिक्षणाधिकारी नितीन नेटके यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2022 ते 2023 या दरम्यान या या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्यात केंद्रांतर्गत 15 शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यात मुला – मुलींची कबड्डी, खो-खो आदी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच संगीत खुर्ची, लिंबू चमचा आदी खेळ दुसऱ्या दिवशी घेण्यात आले.
याप्रसंगी जि प उपशिक्षणाधिकारी भोसे, केंद्रप्रमुख गोरे, केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या औंढा नागनाथ येथील केंद्रप्रमुख तथा माजी गटशिक्षणाधिकारी काळे, केंद्र प्राथमिक शाळा पोटा येथील केंद्रप्रमुख शेळके, केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख सिद्धेश्वरचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक ए. जी. पांढरे, भोसी शाळेचे बि. जी. पांढरे, नंदगावचे ग्रामसेवक प्रतिभा पांढर यांची उपस्थिती होती.
तसेच क्रीडा समितीचे अध्यक्ष ढगे, शाळेचे मुख्याध्यापक पुरी, गणेश वाघमोडे, अंजनवाडा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक भालेराव, सावंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत मंडले, अंजनवाडा तांडा येथील तारामचंद्र अंभोरे, ब्राह्मणवाडा येथील दत्तात्रय सपकाळे, बर्गेवाडी येथील मुख्याध्यापक पांडुरंग दराडे, पातळवाडीचे मुख्याध्यापक राम माने, दुघाळा तांडा येथील रावसाहेब मार्कड, गांगलवाडी चे मुख्याध्यापक वडकुते, नंदगाव तांडा येथील प्रसाद येळणे, नंदगाव येथील मुख्याध्यापक खुडे, शिरडकर, गरड, गुफाडे आदींची उपस्थिती होती.
या क्रीडा स्पर्धाचे सूत्रसंचालन जाधव यांनी केले तर शिरडकर यांनी उपस्थित आमचे आभार मानले.