Marmik
Hingoli live News

औंढा नागनाथ येथे समारंभ पुर्वक वृक्ष लागवड वन महोत्सव कार्यक्रम ; निवडक नगर वनस्थळी होणार 40 हजार वृक्षारोपण

हिंगोली : संतोष अवचार

माझी वसुंधरा अभियान व स्वातंत्रयाचा अमृत्त महोत्सव आणि वनमहोत्सव याचे औचित्य साधुन वनविभाग हिंगोली अंतर्गत वनपरिक्षेत्र प्रादेशिक औंढा नागनाथ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील निवडक नगर वन स्थळी,तसेच इतर निवडक 75 रोपवन स्थळावर 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वनपर्यटन औंढा नागनाथ येथे ‘समारंभ पुर्वक लोकसहभागातुन वन महोत्सव’ कार्यक्रम घेण्यात आला.

सदरील वृक्षारोपन कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली संजय दैने, अप्पर पोलीस अधिक्षक हिंगोली यशवंत काळे, पोलीस उपअधिक्षक हिंगोली वाखारे, विभागीय वनअधिकारी बाळासाहेब कोळगे, तहसिलदार औंढा नागनाथ कानगुले, गटविकास अधिकारी औंढा नागनाथ सखाराम बेले, पोलीस निरीक्षक औंढा विश्वनाथ झुंजारे, सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक खोकले, वृक्षप्रेमी महेश खुळखुळे,पत्रकार, आणि कृषि महाविद्यालय गोळेगाव येथिल प्राध्यापक पी.के.वाघमारे व कृषि महाविद्यालय गोळेगाव येथिल विद्यार्थी व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व विद्यार्थी आणि नागरिक यांचे हस्ते एकुण 2 हजार 700 रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले. सदरील ठिकाणी एकुण 40 हजार रोपांचे वृक्षारोपन करण्यात येणार आहे.

वृक्षारोपन केल्यानंतर मान्यवरांना वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय औंढा नागनाथ यांच्या तर्फे तुळसीचे रोप भेट म्हणून देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विद्यार्थी व उपस्थितांना वनाबद्दल व आपल्या जिवनात झाडांचे किती मोठे योगदान आहे हे सर्वांना पटवुन दिले व सर्वांनी दरवर्षी वृक्षारोपन करुन त्याचे संगोपन करावे, असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता पडोळे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय औंढा नागनाथ कुंडलिक होरे यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागीय वनअधिकारी वनविभाग हिंगोली बाळासाहेब कोळगे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय औंढा नागनाथ कुंडलिक होरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदिप वाघ, रावणपल्ले, माधव जावडे, सय्यद, तसेच वनरक्षक चोपडे, सातपुते, आयनिले, गायकवाड, बेले, अंगद आयनले, श्रीमती लोणे, राठोड, जाधव, श्रीरामे, गांजवे, श्रीमती नागरगोजे, खंडागळे व वनपरिक्षेत्र औंढा नागनाथ अंतर्गत येणा-या सर्व वनमजुर यांनी परिश्रम घेतले.

Related posts

15 जूनपासून सर्व शाळांमध्ये ‘हात धुवा’ कार्यक्रम राबवा- जिल्हाधिकारी

Santosh Awchar

जिल्ह्यातील साठवण तलाव ओव्हरफ्लो

Santosh Awchar

आणखी एक आरोपी कारागृहात स्थानबद्ध

Santosh Awchar

Leave a Comment