Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

चंपाषष्ठी : सातारा येथे उद्यापासून खंडोबा यात्रेस प्रारंभ

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजी नगर – शहरालगत असलेल्या सातारा – देवळाई येथील प्रसिद्ध व जागृत श्री खंडोबा यात्रेस 18 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. दरवर्षी चंपाषष्ठी निमित्त आयोजित करण्यात येत असलेली ही यात्रा तीन दिवस चालते.

छत्रपती संभाजी नगर लगत असलेल्या व महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सातारा देवळाई येथे श्री खंडोबारायांचे प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. मंदिर जागृत तसेच प्राचीन कलाकृतींनी बनविलेले आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरातील व जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक भक्त येथे श्री खंडोबारायांच्या दर्शनासाठी येत असतात.

दरवर्षी येथे चंपाषष्ठी निमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रेत अंदाजे दहा लाख भाविक भक्त दर्शन घेत असतात. यात्रेनिमित्त सातारा देवळाई श्री खंडोबा मंदिर संस्थान कडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही असुरक्षितता तसेच गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आले असून रेल्वे स्टेशन एमआयडीसी पासून मंदिरापर्यंत पथदिवे बसविण्यात आले आहेत.

तसेच येणाऱ्या भाविकांना पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. या कामी छत्रपती संभाजी महानगरपालिका सहकार्य करत आहे. तसेच यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ही यात्रा 18 ते 21 डिसेंबर अशी राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष रमेश चोपडे व सचिव साहेबराव पळसकर यांनी दिली आहे.

Related posts

परदेशात उच्च शिक्षण आणि करिअर संधीवर माहितीपूर्ण मोफत सेमिनारचे आयोजन

Gajanan Jogdand

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन विद्याशाखांना ‘एन.बी.ए.’चे मानांकन

Gajanan Jogdand

दुथडच्या महिला चालवतात घंटागाडी! राज्यात निर्माण केला आगळावेगळा आदर्श, देश पातळीवर होणार गावाचे सादरीकरण

Gajanan Jogdand

Leave a Comment