मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी वयोवृद्ध महिला चंद्रभागा मनोहर विभुते यांच्या घरात अचानक आग लागून मोठे नुकसान झाले होते. या आगीत अन्नधान्य सह संसार उपयोगी वस्तूही जळून खाक झाल्या होत्या. त्यांना शासनाकडून तहसील कार्यालयामार्फत नुकसान भरपाई म्हणून अनुदानाचा लाभ देण्यात आला. त्यांना नुकसान भरपाई मिळाल्याने मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी वयोवृद्ध महिला चंद्रभागा मनोहर विभुते यांच्या घरात अचानक आग लागून मोठी आर्थिक हानी झाली होती. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.
लागलेल्या या चंद्रभागा विभूते यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूंसह अन्नधान्यही जळून खाक झाले होते. त्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी केली होती.
त्यांच्या या मागणीनुसार तसेच झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाकडून चंद्रभागा विभूते यांना तहसील कार्यालयामार्फत नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून त्यांनी तहसीलदार जीवककुमार कांबळे, रणवीर, तलाठी होडबे, तलाठी जाधव यांचे आभार मानले आहेत.
अनुदानाचा चेक देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांच्यासह दीपक पंडित, धोंडू इंगोले, गजानन हालगे आदींची उपस्थिती होती.