मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 8 ऑगस्ट रोजी हिंगोली दौऱ्यावर आले असता, देशातील १२ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले ८ वे ज्योर्तिलिंग औंढा नागनाथ येथील देवस्थान श्री. औंढा नागनाथाचे त्यांनी आज दर्शन घेतले.
शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी हिंगोली येथील गांधी चौकात झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांना औंढा नागनाथ येथे जाऊन दर्शन घेण्याचा आग्रह केला होता. औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ हे जागृत देवस्थान आहे.
तसेच आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री नागनाथाचे दर्शन घ्यावे असा आग्रह आमदार संतोष (दादा) बांगर यांनी केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे जाऊन श्री नागनाथाचे दर्शन घेण्याचे नमूद होते.
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, संजय राठोड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, सां.बा. उप अभियंता धोंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे आदींची उपस्थिती होती.