मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
हिंगोली – बारा ज्योतिर्लिंग पैकी आठवे ज्योतिर्लिंग मंदिराच्या पूर्व दिशेला एक लोखंडी गेट आहे. 25 जुलै रोजी सकाळच्या सुमारास अचानक लोखंडी गेट पडून १2वर्षीय बालकाच्या अंगावर पडुन बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी सातच्या दरम्यान घडली.
मयत बालकाचे नाव सोमनाथ अरुण पवार (वय वर्ष १2 रा. शिवाजीनगर औंढा नागनाथ) असे आहे. मयत सोमनाथ पवार व त्यांचे आई-वडील व भाऊ हे मामाकडेच औंढा शहरातील शिवाजी नगरात होते .सकाळी सोमनाथ हा घरून निघाला व मी बाहेर जाऊन येतो असे वडीला सांगितले व तो बाहेर गेला.पण लोखंडी गेट पडून बालकाचा मृत्यू झाला.
घटनेची माहीती मिळताच आई वडील,मामा मामी घटनास्थळी आले व सोमनाथ बघीतले आई हबरडा फोडला सर्वाच्या डोळ्यांतुन आश्रु वाहत होते. सकाळी सातच्या दरम्यान घटना घडली असे तेथील आजूबाजूचे दुकानदार सांगत होते.
सदरील घटनेची माहिती औंढा नागनाथ पोलीस निरीक्षक गणपत राहीरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, पो.कॉ.अमोल चव्हाण व मंदिराचे कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले.
सोमनाथ पवार याला औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.हरण यांनी सोमनाथ याला मयत घोषित केले.
नागनाथ मंदीरात सध्या अधिक श्रावण असल्यामुळे नागनाथ मंदिरात हजारो भाविक येत असतात यात दृष्टिकोनातून नागनाथ देवस्थाने मंदिराची देखरेख करणे गरजेचे आहे.
मात्र लोखंडी गेट पडून मयत सोमनाथ पवार या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने औंढा नागनाथ शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाकडुन पुढील प्रक्रिया चालू आहे.