मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील प्रसिद्ध वंशेश्वर मंदिर येथील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी 25 ते 30 हजार रुपये चोरून नेल्याची घटना 10 ते 11 सप्टेंबर दरम्यान घडली होती. सदरील प्रकरणात तीन अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 39 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात मंदिरातील दानपेटी तोडण्यासाठी वापरलेले लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथे महादेवाचे प्रसिद्ध असे वंशेश्वर मंदिर आहे. सदरील मंदिरातील ओट्यावरील लोखंडी दानपेटी 10 ते 11 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेऊन त्याचा कुलूप कोंडा तोडून त्यातील देणगी स्वरूपात असलेली अंदाजे 25 ते 30 हजार रुपये चोरून नेले होते. या संदर्भात 12 सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा तात्काळ उघड करण्याबाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते. त्यावरून स्थानिक दिन शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने घटनास्थळ व परिसरात जाऊन तपास केला. तसेच गोपनीय यंत्रणेच्या व सायबर सेल यांची मदत घेऊन अवघ्या दोन दिवसात सदर गुन्हा उघड केला.
सदरचा गुन्हा सेनगाव येथे राहणारे तीन अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांनी मिळवून केल्याचे निष्पन्न करून तीनही विधी संघर्ष ग्रस्त बालकांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील मंदिरातील दानपेटी तोडून चोरून नेलेले नगदी रुपये चलने नोटा व चिल्लर कॉईन असे एकूण 25 हजार 725 रुपये व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले व दोन अँड्रॉइड मोबाईल किंमत 15000 रुपये असा एकूण 39 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात मंदिरातील दानपेटी तोडण्यासाठी वापरलेले लोखंडी रॉड जप्त केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, पोलीस अंमलदार भगवान आडे, सुनील अंभोरे, नितीन गोरे, राजूसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन, शेख जावेद, प्रशांत वाघमारे, सुमित टाले, प्रकाश झाडे आदींनी केली.