मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – इयत्ता दहावी परीक्षेच्या इंग्रजी विषयाचा पेपर 7 मार्च रोजी पार पडला या पेपरला 5 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. त्यांच्यावर भरारी पथकाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात इयत्ता 10 वीच्या परीक्षा 54 परीक्षा केंद्रावर पार पडत आहेत. 7 मार्च रोजी सकाळ सत्रात इंग्रजी या विषयाचा पेपर पार पडला.
इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेला 16 हजार 114 विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 800 विद्यार्थी उपस्थित होते. 314 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. उपस्थित आमचे प्रमाण 98.05 टक्के एवढे राहिले.
तसेच बारावीच्या वस्त्रशास्त्र या विषयाचा पेपर पार पडला. या विषयाच्या परीक्षेला 287 विद्यार्थ्यांपैकी 275 विद्यार्थी उपस्थित होते. बारावी विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
विभागीय मंडळाने नेमलेल्या 5 भरारी पथकाने 7 मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. इयत्ता दहावी इंग्रजी विषयाच्या पेपरला 5 विद्यार्थी गैरप्रकार करत असताना आढळून आले. त्यांच्यावर भरारी पथकाने कार्यवाही केली.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका करणाऱ्या सहाय्यक परिरक्षकासोबत पोलीस कर्मचारी देण्यात आलेला आहे, असे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.