मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने इयत्ता 10 वी व 12 वी च्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) च्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
या पत्रकार नुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) सर्वसाधारण व द्वीलक्षी अभ्यास क्रम परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) व्यवसाय अभ्यासक्रम ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा (इयत्ता 12वी) दि. 20 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी चे लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे.
सदरील कालावधीत आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.