Marmik
Hingoli live News

स्वच्छता ही सेवा : मुख्यमंत्र्यांनी साधला हिंगोली जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील सरपंचांशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वेब कॉस्टद्वारे एनआयसी ऑनलाईन व्हीसीद्वारे सरपंचांशी संवाद साधला.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून स्वच्छता ही सेवा उपक्रम रवीला जात आहे.

सदरील उपक्रमा अंतर्गत 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे पाणीपुरवठा तसेच स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील सरपंचांसोबत कॉस्टद्वारे ऑनलाइन स्वच्छता सरपंच संवाद या कार्यक्रमात संवाद साधला.

सदर कार्यक्रमात कचरा मुक्त भारत, स्वच्छतेचे महत्व, आवश्यकता, गावस्तरावर आरोग्य विषयक बाबी, ग्रामीण जनतेशी संवाद साधत असताना आपली जबाबदारी व भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाटेगावकर, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद हिंगोली येथील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच,

ग्रामपंचायत सदस्य, सर्व विस्तार अधिकारी, जिल्हा कक्षातील सर्व तज्ञ पंचायत आरोग्य, स्वभामी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी पंचायत समिती स्तरावरील गट समन्वयक समूह, समन्वयक, ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सेवक, संगणक चालक, जलसुरक्षक हे या कार्यक्रमास उपस्थित होते.

स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालयाचा नियमित वापर, परिसर स्वच्छता, त्यासोबतच वैयक्तिक स्तरावरील स्वच्छतेला किती महत्त्व आहे, याबाबत गाव स्तरावर काम करत असताना गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Related posts

दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाची प्रतिबंधीत सुगंधीत पान मसाला व तंबाखू वर कार्यवाही

Santosh Awchar

अनुसूया बाल विद्या मंदिर येथे रक्षाबंधन साजरे

Gajanan Jogdand

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता; देशाच्या प्रत्येक गावातून आणलेल्या मातीच्या सुगंधाने कर्तव्य पथ दरवळला!

Gajanan Jogdand

Leave a Comment