मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईने अधिकारी झालेल्या कामाच्या बिल रकमेच्या 5 टक्के रक्कम मागणी करतात ही बाब स्पष्ट झाली सदरील कारवाईने अधिकाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
कळमनुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर वय वर्षे 52 नगरपरिषदेचे लेखापाल वर्ग 3 राहुल विजय जाधव व वरिष्ठ लिपिक वर्ग 3 मोहम्मद झाकीर हुसेन अहमद हुसेन यांनी तक्रारदार यांच्या मुलाने काम पूर्ण केलेल्या सिमेंट रोडच्या बिलाची रक्कम 8 लाख 4 हजार 611 रुपयांचा चेक देण्यासाठी सदर बिलाचे पाच टक्के रक्कम म्हणजे 40 हजार रुपयांची मागणी करून सदरील रक्कम आरोपी राहुल विजय जाधव व मोहम्मद जाकीर हुसेन अहमद हुसेन यांच्या मार्फत स्वीकारून स्वतःकडे घेतली सदरील रक्कम घेताना लाचलुचपत विभागाने या तिघांनाही सापळा रचून पकडले असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीचे पोलिस उपाधीक्षक निलेश सुरडकर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुष्कर, सापळा कारवाई पथक पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धिकी, पो. ह. विजय उपरे, पो. ना. ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, मा. पो. ना. योगिता अवचार, पोलीस शिपाई राजाराम फुफाटे, चा. पो.ना. हिम्मतराव सरनाईक सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली युनिटच्या पथकाने केली.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट त्यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुळका व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक 962399944 व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपाधीक्षक 9822200959 हिंगोली यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.