Marmik
Hingoli live News

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाणे टंचाई! ग्रेन मार्केट व संत नामदेव हळद मार्केट दोन दिवस बंद!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नाणे टंचाई उत्पन्न झाली आहे. त्यामुळे ग्रेन मार्केट व संत नामदेव हळद मार्केट मधील सर्व खरेदी – विक्रीचे व्यवहार दोन दिवस बंद राहणार आहेत, तसे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे.

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हळद, तुर, गहू, ज्वारी, मूग व उडीद खरेदी केले जात आहेत. हळदीला येथील बाजार समितीमध्ये 13 हजार रुपयांपासून 14 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तुरीला 10 हजार 100 रुपयांपासून साडेदहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.

सोयाबीनला 4600 रुपयांपासून 4 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळत आहे तर ज्वारीला अडीच हजार रुपयांपासून साडेचार हजार रुपयांचा दर मिळत आहे.

तसेच मुगास 6 हजार 900 रुपयांपासून 7450 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे तर उडदाला सहा हजार एकशे पन्नास रुपयांपासून साडेसहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

सध्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला हळदीचा 5000 क्विंटल एवढा साठा आहे. तर ग्रेन मार्केट येथे सुद्धा विविध धान्यांचा अंदाजे दोन ते तीन हजार क्विंटल एवढा साठा असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल हा निर्यात न झाल्याने येथील ग्रेन मार्केट व संत नामदेव हळद मार्केट मध्ये नाणे टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत हे दोन्ही मार्केट मधील सर्व खरेदी – विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत.

शेतमाल निर्यात न झाल्याने नाणे टंचाई!

हिंगोली येथील ग्रेन मार्केट व संत नामदेव हळद मार्केट मध्ये सध्या निर्माण झालेल्या नाणेटंचाईचे मुख्य कारण हे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेला शेतमाल हा निर्यात न झाल्याचे आहे. सध्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली हळद साठा अंदाजे पाच हजार क्विंटल एवढा असून इतर धान्यांचा साठा हा दोन ते तीन हजार क्विंटल आहे, असे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.

खरे काय?

हिंगोली येथील ग्रेन मार्केट वसंत नामदेव हळद मार्केट नाणे टंचाईचे कारण देऊन 21 ते 23 ऑगस्ट या दरम्यान बंद ठेवण्यात आले आहे. येथील सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार या दोन दिवशी बंद राहतील; मात्र ग्रेन मार्केट वसंत नामदेव हळद मार्केट मधील खरेदी – विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचे कारण वेगळेच असल्याचे दिसते. शेतमाल विकत घेणारे सर्व व्यापारी हे 20 ऑगस्ट पासूनच हिंगोली बाहेर कुठेतरी गेल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे हिंगोली येथील ग्रेन मार्केट वसंत नामदेव हळद मार्केट मधील सर्व खरेदी – विक्रीचे व्यवहार या दोन दिवशी बंद ठेवण्याचे खरे कारण काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Related posts

विराट राष्ट्रीय लोक मंच विविध प्रश्न घेऊन 27 डिसेंबर पासून नागपूर विधानभवनासमोर करणार अमरण उपोषण

Santosh Awchar

13 ऑगस्ट रोजी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलची बैठक

Gajanan Jogdand

जिंतूर – फाळेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या नाल्यांना गेले तडे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Jagan

Leave a Comment