मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वचन करावी म्हणून प्रत्येक आठवड्यात चार दिवस उपविभागी पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत विशेष कोंबिंग ऑपरेशनची कार्यवाही केली जात आहे.
27 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील लिंबाळा मुक्ता व परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
सदर मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण मळघणे, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, सुवर्णा वाळके, संजय केंद्रे व 20 पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
सदर मोहिमेत लिंबाळा मुक्ता येथील पारधी वाडा येथे रेकॉर्डवरील आरोपींचे तसेच निगराणी बदमाश यांना चेक करण्यात आले. हद्दपार असलेले दोन आरोपींनाही त्यांच्या घरी जाऊन व परिसरात तपासण्यात आले.
सदर मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांच्याकडील तपासावरील भादवी सह कलम अजाजअप्रति कायदा मधील फरार दत्ता लिंबोळे (रा. पांगरी) यास ताब्यात घेण्यात आले.
तसेच न्यायालयाकडून प्राप्त अटक वॉरंट मधील इसम शेख बाबू शेख बशीर (रा. लिंबाळा) यास पकडून न्यायालयात हजर करण्यात आले. तर अटक वॉरंट मधील चार महिलांना न्यायालयात हजर होण्याबाबत समाज देण्यात आली.
सदर मोहिमेदरम्यान अचानक काही वेळ नरसी फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली.