Marmik
क्राईम

जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन: 16 ठिकाणी गुन्हेगार तपासणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. 16 ठिकाणी गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच अनेकांवर विविध कलमान्वये कारवाई देखील करण्यात आली.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून-छपून चालणाऱ्या अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आणि चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.

याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही फरार व पाहिजे तसेच न्यायालयाचे वॉरंटमधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 12 डिसेंबर रोजी च्या रात्री 11 वाजेपासून 13 डिसेंबर रोजी च्या पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक पडवळकर,

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे,

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे,

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने व सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

या मोहिमेत एकूण 16 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील वसराईत गुन्हेगार आहेत, अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील मोक्कामधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

तसेच सदर मोहिमेत हिंगोली शहर पोलीस ठाणे, वसमत शहर, वसमत ग्रामीण येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा एकूण 21 अटक वॉरंट तामिल करण्यात आले.

हद्दपारिचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात हजर मिळून आल्याने एका व्यक्तीवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय एक कार्यवाही करण्यात आली.

तर अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या व्यक्तीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे, गोरेगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, औंढा नागनाथ, हट्टा येथे एकूण 9 व्यक्ती विरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत एक अवैध दारू विक्री विरोधात कार्यवाही करण्यात आली.

Related posts

ईसापुर रमना येथील महिलेचे खून प्रकरण; आरोपी पतिवर गुन्हा दाखल

Santosh Awchar

वृद्ध महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड, चोरटे फुकट कपडे वाटण्याचे करत होते बतावणी

Santosh Awchar

कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची निवड

Santosh Awchar

Leave a Comment