Marmik
Hingoli live

कोंबिंग ऑपरेशन : हिंगोली व कळमनुरी येथील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीजी श्रीधर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात आठवड्यातून काही दिवस कोंबिंग ऑपरेशन राबविले जात आहे. सदरील ऑपरेशन कळमनुरी येथील इंदिरानगर भागातील झोपडपट्टीत राबवून तेथील रेकॉर्डवरील वसराईत गुन्हेगारांची हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने तपासणी केली.

हिंगोली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कार्यवाही तसेच सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी व प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.

या अनुषंगाने सहा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवून कळमनुरी येथील इंदिरानगर झोपडपट्टी मधील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी केली.

मोक्का व पाहिजे असलेल्या फरार आरोपींच्या शोध घेण्यासाठी सदर परिसरात शोध मोहीम घेऊन त्यात दोन संशयित मोटार सायकल ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

तसेच हिंगोली शहर पोलीस ठाणे अंतर्गत गाडीपुरा परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्यात येऊन एका इसमाकडे बेकायदेशीर रित्या अवैध तलवार मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भा. ह. का. कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कोंबिंग ऑपरेशन कार्यवाहीत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील 20 अंमलदार सहभागी होते.

Related posts

तोषनीवाल महाविद्यालयाकडून वसतिगृहाच्या नावावर विद्यापीठ अनुदान आयोगाची आणि सीबीएससी च्या नावाखाली पालकांची लूट

Gajanan Jogdand

भरोसा सेलने 24 संसाराच्या गाठी केल्या घट्ट! मतभेद विसरून पती-पत्नी व सर्व परिवार आनंदाने आला पुन्हा एकत्र

Santosh Awchar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात92 महिलांच्या समस्यांची सोडवणूक  

Santosh Awchar

Leave a Comment