Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

दिलासादायक : शेतकऱ्यांनो! आता एक रुपयात काढा पीक विमा!! लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाने घेतला निर्णय

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-

सेनगाव – राज्यातील शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सीएससी धारकांकडून शेतकऱ्यांना म्हणून केवळ एका रुपयात पिक विमा काढून मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. पिक भीमा काढण्यासाठी विमा कंपनी मार्फत सीएससी धारकाला प्रति अर्ज रुपये 40 देण्यात येतात. शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत केले जात आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025 – 26 हंगामासाठी तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन 2023 – 24 पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

या अनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीएमएफबीवाय पोर्टल वर स्वतः शेतकरी यांना तसेच बँक विमा कंपनी प्रतिनिधी व सीएससी सेवा केंद्र यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.

पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रुपये 40 देण्यात येते; परंतु राज्यातील काही सीएससीधारक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

या अनुषंगाने सामूहिक सेवा केंद्र सीएससी धारकाकडून केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी व सीएससीने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पिक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र शासन पुणे यांनी केले आहे.

Related posts

सेनगाव येथील दोन मुन्नाभाई वर गुन्हा दाखल

Jagan

जिल्हाधिकाऱ्यांकडून जलेश्वर तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी

Santosh Awchar

भांडेगाव शिवारात प्रवासी पती- पत्नीस अडवून जबरीने दागिने, नगदी रुपये चोरून नेणारे आरोपी अटकेत; सोन्याचे दागिने व 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment