मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – गुजरात येथील सुरत कोर्टाने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली या शिक्षेच्या निषेधार्थ हिंगोली येथे काँग्रेसच्या वतीने वाशिम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सुरत कोर्टाच्या आदेशानंतर राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्या च्या निषेधार्थ हिंगोली येथे काँग्रेसच्या वतीने शासकीय विश्रामगृह समोर गुरुवार (दि.२३ मार्च) रोजी काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.
यामध्ये राष्ट्रवादी, (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पाठिंबा दर्शविला आला. या प्रसंगी प्रधानमंत्री मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामध्ये ‘जब जब मोदी डरता है ई डी को आगे करता है’, अशा घोषणा देण्यात आल्या.
या रस्ता रोकोमुळे काही काळ वांहन धारकांना ताटकळत बसावे लागले. नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने पर्यायी मार्ग करून वाहतूक सुरळीत करण्यात आली, मात्र जेल भरों आंदोलन करत असताना पोलिसांकडे आंदोलनकर्त्यांना जेलमध्ये नेण्याकरिता गाडी उपलब्ध नसल्या कारणाने काही काळ रस्ता रोको आंदोलन चालूच राहिले.
काही वेळाने पोलिसांची गाडी उपलब्ध झाल्या नंतर सर्व रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. या वेळी सचिन नाईक, दिलीप देसाई, माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर, पवन उपाध्ये, भैया देशमुख, सतीश पाचपुते, शेख आलीमुद्दिन,मुनीर पटेल, केशव नाईक, आबेद आली जागीरदार, आदींचा सहभाग होता.