मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – सेनगाव येथील गणपत तुकाराम सुतार यांचे 23 ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 105 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सहा मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या 24 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी 9 वाजता सेनगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सेनगाव येथील धडाडीचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संघटनेचे सेनगाव तालुका अध्यक्ष बबन सुतार यांचे वडील होत.
गणपत तुकाराम सुतार यांनी आपल्या मुलांना समाजात स्वाभिमानी जीवन कसे जगावे व पीडित वंचित समूहांना आपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करावी अशी शिकवण सदैव दिली.
त्यांच्या या मार्गावर त्यांच्या मुलांनी वाटचाल करत मातंग समाजातील तसेच पीडित, वंचित समाजातील अनेकांना अडीअडचणीच्या वेळी मदत केली आहे, करत आहेत.