सेनगाव : जगन वाढेकर /-
तालुक्यातील जयपूर येथील दोन कुटुंबीयांनी मारहाण झाल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्याने गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष पुंजाजी पायघन, सुभाष पुंजाजी पायघन, पुंजाजी पायघन, भिकाजी पायघन (सर्व रा. जयपूर ता. सेनगाव जि. हिंगोली) यांनी 20 जून रोजी संगणमत करून तुमच्या मुलाने आमची मुलगी पळवून नेली या कारणावरून यातील फिर्यादीस आरोपी संतोष पुंजाजी पायघन याने त्याच्या जवळ असलेला चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर मारून जखमी केले व प्लास्टिकच्या दांड्याने दोन्ही पायाच्या मांडीवर मारून मुक्का मार दिला. आरोपी सुभाष पायघन, पुंजाजी पायघन व भिकाजी पायघन यांनी थापडा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी ची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता आरोपींनी त्यांनाही लोटलाट केल्याने फिर्यादी माधव शिवराम गिरी (वय 70 वर्षे व्यवसाय मजुरी रा. जयपूर ता. सेनगाव जि. हिंगोली) यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय दंडविधान अन्वय विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तर 20 जून रोजी साडेआठ वाजता आरोपी जगदीश माधव गिरी, माधव गिरी व उमा गिरी (रा. जयपूर ता. सेनगाव जि. हिंगोली) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलास आरोपी जगदीश माधव गिरी व माधव गिरी म्हणाले की, आम्हाला बीपी च्या गोळ्या दे. फिर्यादीचा मुलगा गोळ्या नाहीत, असे म्हणला असता ते मुलास म्हटले की झक मारायला मेडिकल टाकले का असे म्हणाले. तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्या मुलास विनाकारण बोलू नका, तेव्हा मुलास आरोपी जगदीश माधव गिरी व माधव गिरी यांनी मेडिकल मधून बाहेर पडले व फिर्यादीस त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी जगदीश गिरी याने हातात दगड घेऊन मूठगोटयाने डोक्याच्या उजव्या साईडला मारून जखमी केले व फिर्यादीची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांनाही जगदीश गिरी व माधव गिरी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच माधव गिरी याने हातात दगड घेऊन मोठमोठ्याने डोक्यावर मारून जखमी केले व उमा माधव गिरी हिने शिवीगाळ केल्याची फिर्याद सरस्वती पुंजाजी पायघन (वय 60 वर्षे व्यवसाय घरकाम रा. जयपूर ता. सेनगाव जि. हिंगोली) यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.