मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावून चौकशीसाठी बोलावल्याने या ईडीच्या कारवाई विरोधात हिंगोली येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने 26 जुलै रोजी महात्मा गांधी चौकात शांततेत निदर्शने करण्यात आली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने परत समन्स बजावून चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत दडपशाहीचे राजकारण करून गांधी परिवारावर जाणून-बुजून षड्यंत्र रचण्यात आले. या ईडी विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सुरेश आप्पा सराफ, बापूराव बांगर, नेहाल भैय्या, अनिल नेनवाणी, शोभाताई मोगले, मिलिंद उबाळे, विशाल घुगे, मुजीब कुरेशी, ओमप्रकाश देशमुख, बाबूद भाई, साद अहेमद, बाळू कदम, अबेदअली जहागीरदार, जुबेर मामू, संतोष उबाळे, गंगाराम गाढवे, सखाराम मोठे, गजानन मिटकर, चांदणे, सुधीर मगर, गजानन आठवले, सुरेश जोगदंड, सौरभ धुमाळ, रितेश आठवले, बालाजी आठवले, सुमित मगर, सरपंच वसंतराव जाधव, सचिन मस्के, लक्ष्मण राठोड, संतोष जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.