Marmik
Hingoli live News

भारत जोडो यात्रा : खासदार राहुल गांधी करणार हिवरा पाटी ते कनेरगाव नाकापर्यंत पायी प्रवास, वाहतूक राहणार बंद

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी हे 11 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान भारत जोडो पदयात्रा निमित्त हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असून त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमास इतर राजकीय पक्षाचे वर्गीकृत अवर्गीकृत व्यक्ती हजर राहण्याची शक्यता असून खासदार राहुल गांधी हे नांदेड येथून हिवरा पाटी मार्गे हिंगोली जिल्ह्यात येणार आहेत. पुढे वारंगा फाटा – बाळापुर – कळमनुरी – हिंगोली – कनेरगाव नाका मार्गे वाशिम जिल्ह्यात जाणार आहेत. 11 ते 15 नोव्हेंबर पर्यंत असलेल्या या पदयात्रेत खासदार राहुल गांधी हे हिवरा पाटी ते कनेरगाव नाका (हिंगोली सरहद) पर्यंत पाणीई चालणार आहेत.

यादरम्यान पुढील ठिकाणची वाहतूक बंद करून त्यांना पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यासाठी आदेश दिले आहेत.

सदर भारत जोडो यात्रेदरम्यान 11 नोव्हेंबर रोजी अर्धापूर येथून आखाडा बाळापूर कळमनुरी हिंगोली कडे येणारी सर्व वाहतूक, हदगाव ते वारंगा फाटा मार्गे बाळापुर कडे येणारी वाहतूक, कुर्तडी पाटी ते अर्धापूर कडे जाणारी वाहतूक, बाळापुर कडून नांदेड कडे जाणारी वाहतूक व शेवाळा त्या जवळील गावातील नांदेड कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

11 नोव्हेंबर रोजी नांदेड वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक HMP स्टॉप अर्धापूर येथून मालेगाव – वसमत -मार्गे हिंगोली जातील. नांदेड वरून बाळापुर साठी जाणारी वाहने एच एम पी टॉप अर्धापूर वरून मालेगाव- कवठा- पाटील मार्गे बाळापुर किंवा बोलडा मार्गे कळमनुरी जातील. हिंगोली वरून नांदेड जाणारी वाहतूक उमरापाटी – बोलडा- मालेगाव मार्गे नांदेड जातील. पुसद मालेगाव येथून नांदेड कडे जाणारी वाहतूक कळमनुरी -उमरा पाटी -बोलडा -मालेगाव मार्गे नांदेड जाईल किंवा मालेगाव -बाळापुर -कुर्तडी पाटी -गिरगाव- मालेगाव मार्गे नांदेड जाईल.

12 नोव्हेंबर रोजी दाती पाटील सातव कॉलेज कळमनुरी पर्यंत बंद असलेली वाहतूक पुढील प्रमाणे – अर्धापूर येथून बाळापुर -कळमनुरी -हिंगोली कडे येणारी सर्व वाहतूक, अर्धापूर ते वारंगा फाटा मार्गे बाळापुर कडे येणारी वाहतूक, कुर्तडी पाटी ते बाळापुर कडे जाणारी सर्व प्रकारचे वाहतूक, शेवाळा व त्या जवळील गावातील नांदेड कडे जाणारी वाहतूक, पुसद -शेंबाळ -पिंपरी -मालेगाव मार्गे बाळापूर व कळमनुरी कडे येणारी वाहतूक व उमरापाटी येथून कळमनुरी कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

पर्यायी मार्ग – नांदेड वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक, एचएमपी स्टॉप येथून मालेगाव -वसमत -औंढा नागनाथ मार्गे हिंगोली भोकर वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक, एच एम पी स्टॉप येथून मालेगाव -वसमत -औंढा नागनाथ मार्गे हिंगोली पुसद- शेंबाळ पिंपरी- मालेगाव येथून नांदेड कडे जाणारी वाहतूक, उमरखेड हदगाव मार्गे नांदेड कडे तसेच हिंगोली वरून नांदेड जाणारी वाहतूक, उमरापाटी- बोलडा मालेगाव मार्गे नांदेड जातील किंवा औंढा नागनाथ- शिरड शहापूर- मालेगाव मार्गे नांदेड जातील. दादी पार्टी ते सातव कॉलेज कळमनुरी मार्ग खासदार राहुल गांधी हे रात्री विश्रांतीला गेले तेव्हापासून त्यावेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत प्रमाणे सोडता येईल.

13 नोव्हेंबर रोजी खासदार राहुल गांधीही सातव कॉलेज कळमनुरी येथे मुक्कामी असून या दिवशी बंद असलेली वाहतूक पुढील प्रमाणे – अर्धापूर येथील बाळापुर- कळमनुरी -हिंगोली कडे येणारी सर्व वाहतूक, हादगाव ते वारंगा फाटा- बाळापुर मार्गे कळमनुरी हिंगोली कडे येणारी वाहतूक, बाळापुर वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक, पुसद -शेंबाळ पिंपरी- माळेगाव मार्गे कळमनुरी येणारी वाहतूक, मसोड पाटी येथून कळमनुरी कडे जाणारी वाहतूक उमरा पाटील येथून कळमनुरी कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

पर्यायी मार्ग – नांदेड वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक एच एम पी स्टॉप येथून मालेगाव -वसमत -औंढा नागनाथ मार्गे हिंगोली भोकर वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक एच यम पी स्टॉप येथून मालेगाव- वसमत -औंढा नागनाथ मार्ग हिंगोली -पुसद शेंबाळपिंपरी -मालेगाव येथून हिंगोली कडे जाण्यासाठी खंडाळा -सिरसम- माळहिवरा मार्गे हिंगोली वरून नांदेड जाणारी वाहतूक उमरापाटी -बोलडा -माळेगाव मार्ग नांदेड कडे जातील किंवा औंढा नागनाथ- शिरड शहापूर मार्गे नांदेड कडे जातील. खासदार राहुल गांधी हे सातव कॉलेज कळमनुरी येथे मुक्कामी असून रात्री विश्रांतीला गेले तेव्हापासून त्या वेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत प्रमाणे सोडता येईल.

14 नोव्हेंबर रोजी सातव कॉलेज कळमनुरी ते वडद पाटी पर्यंत बंद असलेली वाहतूक पुढीलप्रमाणे – नांदेड बाळापुर येथून हिंगोली कडे येणारी वाहतूक हादगाव -वारंगा फाटा मार्गे हिंगोली कडे येणारी वाहतूक, पुसद शेंबाळपिंपरी माळेगाव मार्गे कळमनुरी व हिंगोली कडे येणारी वाहतूक सालेगाव रुपुर येथून कळमनुरी मार्गे हिंगोली कडे येणारी वाहतूक, मसोड फाटा येथून कळमनुरी कडे व हिंगोली कडे येणारी वाहतूक, उमरा फाटा येथून कळमनुरी कडे व हिंगोली कडे येणारी वाहतूक, सावरखेडा गावातून तसेच सावरखेडा बायपास येथील हिंगोली कडे कळमनुरी कडे येणारी वाहतूक, खटकाळी किंवा अकोला बायपास येथून कळमनुरी कडे जाणारी हिंगोली कडे जाणारी वाहतूक, नरसी टी पॉईंट येथून हिंगोली कडे येणारी वाहतूक, जवळा पळशी येथून हिंगोली कडे येणारी वाहतूक, बासंबा टी पॉईंट येथून हिंगोली कडे व कनेरगाव नाका कडे जाणारी वाहतूक, बाळ हिवरा येथून हिंगोली कडे केव्हा कनेरगाव कडे जाणारी वाहतूक, राजगाव येथून कनेरगाव कडे येणारी वाहतूक, वाशिम वरून कनेरगाव कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

पर्यायी मार्ग – नांदेड वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक HMP स्टॉप येथून मालेगाव -वसमत -औंढा नागनाथ मार्ग हिंगोली भोकर वरून हिंगोली येणारी वाहतूक एच एम पी स्टॉप येथून मालेगाव- वसमत -औंढा नागनाथ मार्गे हिंगोली पुसद -शेंबाळपिंपरी -मालेगाव येथील कुर्तडी पाटी -बोलडा- औंढा नागनाथ मार्गे हिंगोली वरून नांदेड जाणारी वाहतूक, पुसद- शेंबाळपिंपरी -माळेगाव -बाळापुर मार्गे किंवा पुसद- उमरखेड मार्ग नांदेड जातील. तसेच वाशिम वरून परभणी जाणारी किंवा हिंगोली कडे जाणारी वाहतूक, रिसोड -सेनगाव -नरसी टी पॉईंट मार्गे हिंगोली कडे किंवा औंढा नागनाथ परभणी कडे जातील. खासदार राहुल गांधी हे रात्री विश्रांतीला गेले तेव्हापासून त्या वेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत प्रमाणे सोडता येईल.

15 नोव्हेंबर रोजी भारत जोडू यात्रा ही वडद पाटी ते राजगाव वाशिम जिल्हा हद्दीत प्रवेश करणार असून यादरम्यान पुढील वाहतूक बंद राहील. हिंगोली वरून वाशिम कडे जाणारी वाहतूक, माळहिवरा येथून कनेर गावाकडे जाणारी वाहतूक, सेनगाव -गोरेगाव मार्गे कनेरगाव वरून हिंगोली कडे येणारी वाहतूक, राजगाव येथून कनेरगाव कडे येणारी वाहतूक, वाशिम वरून कनेरगाव कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

पर्यायी मार्ग – हिंगोली वरून वाशिम जाण्यासाठी नरसी टी पॉईंट -सेनगाव- रिसोड मार्गे वाशिम जातील. वाशिम वरून हिंगोली किंवा परभणी जाणारी वाहतूक रिसोड -सेनगाव -नरसी टी पॉइंट मार्गे हिंगोली किंवा औंढा नागनाथ परभणी, वाशिम वरून नांदेड जाणारी वाहतूक पुसद -शेंबाळ पिंपरी -माळेगाव -बाळापुर मार्गे किंवा पुसद -उमरखेड मार्गे नांदेड माळहिवरा येथून वाशिम जाणारी वाहतूक अनसिंग मार्गे वाशिम जातील. वडद पाटील ते राजगड वाशिम मार्ग हा खासदार राहुल गांधी हे रात्री विश्रांतीला गेले तेव्हापासून त्यावेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वाहतूक पुरवठप्रमाणे सोडता येईल.

जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) अन्वय प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार सदर मार्गाने वाहतूक वळविली आहे.

Related posts

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या फेस पेंटिंग स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण

Santosh Awchar

13 ऑगस्ट रोजी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलची बैठक

Gajanan Jogdand

विशेष मोहिमेत हिंगोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; फरार एकूण 50 इसमांना पकडून न्यायालयात केले हजर!

Santosh Awchar

Leave a Comment