मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील महावितरण कार्यालयाच्या हिंगोली शहर शाखेत 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 साली लिहून तयार केले. तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिन भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून महावितरण कार्यालयाच्या हिंगोली शाखा क्रमांक 2 येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महावितरण कार्यालयाच्या हिंगोली शाखा क्र. 2 चे अभियंता मेश्राम, विश्वनाथ बनसोडे, पंडित शिंदे, कीर्तनकार अमोल, रवी खंदारे आदींची उपस्थिती होती.