मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – बांगलादेशी अल्पवयीन मुलीची खरेदी करून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आरोपी पती-पत्नीसह तिघांना हरसुल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक बंगाली डॉक्टर आहे. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे हर्सूल येथे दि.21/01/2024 रोजी एक बांगलादेशातील फिर्यादी बालिकेच्या तक्रारीवरुन पो.स्टे.हर्सूल येथे गुरन, 14/2024 कलम-370 (1), 370(A),376,376(2)(N),343,34 भादंविसह कलम 44,6,8,12 बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 सह कलम 3,4,5,6 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दि. 20/01/2024 रोजी एक बांगलादेशी बालिका वय-16 वर्षे, ही सांयकाळी 5 वाजता पोलीस आयुक्त सो, यांचे कार्यालयात जावुन हकिकत सांगितल्याने अपर्णा गिते पोलीस उपआयुक्त (गुन्हे) यांनी सदर प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन दामिनी पथकला आदेश देवुन तात्काळ पोलीस ठाणे हसुल येथे बालिकेस पाठविले यावरुन सदर बालिके जवळ चौकशी करुन वर नमुद प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी/पोलीस निरीक्षक प्रशांत भालचंद्र पोतदार हे करत आहेत.
सदर गुन्ह्याचे तपासात हर्सूल हद्दितील राहणारे महिला आरोपी नामे समीना सईद शाह (वय-34 वर्षे, राह-हसुल), सईद मेहताब शाह (वय-42 वर्षे, राह-हसुल), वाजिद इलियास शेख (वय-28राह-हसुल) यांना दि.21/01/2024 रोजी अटक केले असुन, सदर तिनी आरोपी दि. 29/01/2024 पावेतो पोलीस कोठडी मध्ये आहेत.
तपासामध्ये महिला आरोपी व दोन्ही पुरुष आरोपीने पुणे येथील महिला नामे- राणी व राणीचा पती, आशा शेख यांच्या मार्फतीने छत्रपती संभाजीनगर शहरात वेश्या व्यवसाय करिता महिला/मुली पुरवुन सेक्स रॅकेट चालवितो असे सांगितले. तसेच पिडीत बालिकेने सुध्दा राणी व राणीचा पती, आशा शेख या तिघांनी वेश्या व्यवसाय करणे करिता भाग पाडुन छळ केल्याचे तक्रारीत सांगितले.
यावरुन पुणे येथील सेक्स रॅकेट चालवणारे आरोपीताना ताब्यात घेणे करिता पोउपनि मारोती खिल्लारे, पोउपनि सुनिल चव्हाण, मपोह असिफीया पटेल, पोना शिदे यांचे पोलीस पथक तयार करुन पुणे येथे रवाना केले.
त्यानंतर पुणे येथील आरोपीताचे नाव पत्ते पुर्ण माहिती नव्हते तरी पिडीत बालिकेची मदत घेवुन पथकानी पुणे येथील सासवड, ता. पुरंदर येथे आरोपी राणी व राणीचा पती यांचा कसुन शोध घेतला असता, त्यातील राणीचा पती नामे-प्रशांत प्रतुश रॉय (वय-36 वर्षे, राह-सासवड, पुणे), हा एक बंगाली मुळव्याध आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचे समजले. त्यावरुन सदर आरोपीचे राहते घरातुन त्यास ताब्यात घेतले.
तसेच आरोपी राणी ही गुन्हा दाखल झाल्याचे तिला समजल्याने ती दोन दिवसापासुन फरार असल्याचे बंगाली डॉक्टरनी सांगितले. त्यावरुन बंगाली डॉक्टरनी यापुर्वी सुध्दा राणीच्या मदतीने वेश्या व्यवसाय करणे करिता महिला छत्रपती संभाजीनगर येथे पुरविल्याचे सांगितले.
बंगाली डॉक्टर आरोपीकडुन गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर महिला आरोपी आशा हिचा पिडीताने सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेत शोधाशोध केली. बुधवार पेठ हे गजबजलेले ठिकाण असुन पीडित मुलीचे पूर्ण नाव व फोटो सुध्दा उपलब्ध नसताना हि शोध घेणे मुश्कील जात होते.
परंतु, स्थानिक पोलीस व गुप्तबातमीदार यांची मदत घेवुन बुधवार पेठेत अनेक ठिकाणी पथकानी शोधा शोध केली असता, पीडित अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर प्राप्त करुन छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयातील सायबर शाखेच्या तांत्रिक मदतीने सदर महिला आरोपी नामे-आशा हसन शेख (वय-40 वर्षे राह-नानापेठ, भोईगल्ली, बुधवारपेठ पुणे) हीस बुधवार पेठ येथुन ताब्यात घेतले.
सदर गुन्ह्यात आज पावेतो एकुण-05 आरोपी अटक करण्यात आले असुन एक महिला आरोपी फरार झाली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास प्रभारी अधिकारी/पोलीस निरीक्षक प्रशांत भालचंद्र पोतदार हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त परि- ०२, नवनित कॉवत, अपर्णा गिते पोलीस उपायुक्त (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, सिडको विभाग यांचे मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, मपोह पटेल, मपोह कोलते, पोह डकले, पोह हंबिर, पोह शिंदे, पोह दहिफळे, पोअं गुसिंगे, पोअं महाजन यांनी कामगिरी केली.