मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – हिंदू तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा देश विघातक कृतींसाठी वापर केला जात आहे. तसेच त्यांची हत्या केली जात आहे. सदरील प्रकार थांबविण्यासाठी देशात लव जिहाद विरोधी कायदा बनवून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची तरतूद करून सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी स्पेशल कोर्टाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी सेनगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेत सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचे रक्षण व प्रसार करण्याचा कायदेशीर अधिकार दिलेला आहे. त्यासोबतच स्वच्छेने कोणत्याही धर्माचे पालन करण्याची सवलत दिलेली आहे, परंतु मागील काळात हिंदू धर्मातील अनेक व्यक्तींचे बेकायदेशीरपणे पैसे नोकरी लग्नाचे आम्ही तसेच इतर प्रलोभन दाखवून फसवणूक करून तसेच धमकावून इतर धर्मामध्ये धर्मांतर करून घेतल्याचे आढळून येत आहे.
याच धर्तीवर संपूर्ण देशभरात वयात आलेल्या तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतर करून विवाह केल्याचे बरेच प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकारे लव जिहादच्या माध्यमातून हजारो हिंदू मुलींचे धर्मांतर करून इतर धर्मात पळवून नेले आहेत.
यापैकीच काही मुलींचा वापर देश विघातक कृतींसाठी तसेच आतंकवादी कारवायांसाठी करण्यात येत असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणेच्या निदर्शनास आलेले आहे. त्याचप्रमाणे अशा लव्ह जिहादच्या माध्यमातून पळवून नेलेल्या कित्येक मुलींची निर्दयी हत्या केल्या गेल्या आहेत.
या सर्व बाबी कित्येक प्रकरणातून सुस्पष्टपणे सिद्ध होऊन देखील आजपर्यंत याची गांभीर्याने दखल घेतल्या गेले नाही. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना एक प्रकारे खतपाणी मिळत आहे व अशा प्रकारचे बेकायदेशीर धर्मांतरण अविरत सुरू आहे.
ही बाब निश्चितपणे सकल हिंदू समाजाचे धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच देशाच्या सुरक्षेवर संकट असून याला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात देशावर मोठे संकट येऊ शकते. या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेनगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्म रक्षण मोर्चा काढून जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात संपूर्ण देशात लव जिहाद विरोधी कायदा बनवून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची तरतूद करून ही सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी स्पेशल कोर्टाची स्थापना करावी संपूर्ण देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवून यामध्ये दोषी आढळण्यावर कठोर कार्यवाहीची तरतूद करून ही सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी स्पेशल कोर्टाची स्थापना करण्यात यावी, संपूर्ण देशात स्वच्छ ने होणारे धर्मांतरण नियमित करण्यासाठी एक नियमावली ठरवून देऊन त्यासाठी एक स्वतंत्र विभागाची स्थापना करावी.
तसेच कोणत्याही प्रकारचे प्रलोभणे धमकावणे अथवा फसवणूक इत्यादी प्रकारे सुरू असलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करून असे बेकायदेशीर धर्मांतरण करण्यावर बंदी आणावी. त्याचप्रमाणे संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्याच्यामार्फत सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, दिल्ली येथे हिंदू मुलगी श्रद्धा वलकर हिचा आफताब पूनावाला या जिहादीने केलेल्या निर्दयी हत्याचा खटला जलद गती न्यायालयात चालून सदर विकृत क्रूर व्यक्तीस भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सेनगाव तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत