मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथे जिल्हा प्रशासनातील विविध विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात एस. पी. 11 संघाने प्रथम बाजी मारली तर नगर परिषदेचा संघ उपविजेता ठरला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने हिंगोली जिल्हा प्रशासनातील विविध विभागामध्ये कोणासोबत समन्वय राहावा व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून व नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या पुढाकारातून 15 व 16 ऑगस्ट या दरम्यान क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिकेट चालण्यात विविध विभागातील एकूण 13 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये एस.पी. 11 संघ, महसूल विभाग संघ, सार्वजनिक बांधकाम संघ, नगरपरिषद संघ, पत्रकार संघ, नगरसेवक संघ, न्यायालयीन कर्मचारी संघ, वकील संघ, जिल्हा परिषद संघ, महावितरण संघ, एस आर पी एफ संघ यांचा समावेश होता. दोन दिवसात अत्यंत चुरशीने चाललेल्या सामन्यांमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस विभागाचा एस. पी. 11 हा संघ प्रथम विजेता ठरला तर नगर परिषदेचा चॅलेंजर न. पा. संघ उपविजेता ठरला.
सदरचे सामने हे हिंगोली नगर परिषदेच्या टर्फ क्रिकेट मैदानावर घेण्यात आले. एस. पी. 11 संघाचे कर्णधार हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे होते तर हिंगोली नगर परिषदेच्या संघाचे कर्णधार मुख्याधिकारी अरविंद मुंडे हे होते.
सदर सीरीज मध्ये मॅन ऑफ द मॅन व मॅन ऑफ द सिरीज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, बेस्ट बॅट्समन तोसीब, बेस्ट बॉलर बाळू बांगर, बेस्ट बिल्डर गजानन डुरे, इमेजिंग प्लेयर न. प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, बेस्ट कॉमेंट्रेटर अतुल शेवाळे बेस्ट अंपायर जुनेद शेख, राजू जाधव यांनी ट्रॉफी स्वीकारली