Marmik
क्राईम

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; पाच आरोपींना घेतले ताब्यात

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वसमत शहर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा दरोड्याचा डाव उधळला आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या वसमत शहर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक मोटर सायकल, एक मोबाईल असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली 18 फेब्रुवारी रोजी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पथक वसमत परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला माहिती मिळाली की, दगडगाव रेल्वे पुल ते रोहन खानावळ वसमत येथे काही इसम संशयास्पदरित्या अंधारात दबा धरून व एखादा गंभीर मालाविरुद्धचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे थांबले आहेत, अशी माहिती मिळाली.

यावरून सदर विसमांची हालचाल ही संशयास्पद वाटल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांचा सह सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत एक इसम घटनास्थळावरून पळून गेला.

घटनास्थळी पोलिसांनी हिरासिंग मोहनसिंग बावरी (वय 20 वर्षे, रा. देऊळगाव राजा जि. बुलढाणा) दीपकसिंग रघुवीरसिंग चव्हाण, बादलसिंह रणजीतसिंग चव्हाण, सुंदरसिंग रणजीतसिंग चव्हाण, जसूसिंग रघुवीरसिंग चव्हाण (सर्व रा. रेल्वे स्टेशन रोड जवळ वसमत ता. वसमत जि. हिंगोली) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे तरोडा टाकण्यासाठी वापरणारे हत्यार यात एक लोखंडी तलवार, एक कटावणी, एक चाकू व लोखंडी रॉड, दोरी आणि एक कोयता, तसेच एक मोटार सायकल व जुना वापरता मोबाईल असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पोलीस पथकाने सर्व साहित्य जप्त करून नमूद आरोपी व घटनास्थळावरून पळून गेलेले त्याचे साथीदार असे 6 व्यक्ती विरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात भादंविसह कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वसमत शहर पोलीस करत आहेत.

ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हकीम शेख, पोलीस हवालदार गारोळे, पोलीस नाईक चव्हाण, वडगावे, पतंगे मपोशी चव्हाण, पिठलेवाड यांनी केली

Related posts

कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारे वाहन पकडले; तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल

Santosh Awchar

गोळीबार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस

Gajanan Jogdand

52 ताश पत्त्यावर चालणाऱ्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई, 3 लाख 86 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Santosh Awchar

Leave a Comment