Marmik
Hingoli live क्राईम

सहा फेसबुक वापरकर्त्यांवर सायबर सेलची कार्यवाही; आक्षेपार्य मजकूर केला पोस्ट

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये, त्यावर प्रतिबंध बसावा, त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.

सदर पथक अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पवार, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्ता नागरे, रोहित मुदीराज, इरफान पठाण यांची नेमणूक केली आहे.

या सायबर सेल विभागाने मागील आठवड्यात 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या दरम्यान कार्यवाही केली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या सहा फेसबुक वापरकर्त्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वये नोटीस देऊन सोशल मीडिया पेज व अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

अशाप्रकारे जाती-धर्मांमध्ये पेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वयक व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कृत्य करणाऱ्यांची जलवारी अटळ असल्याचे जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

औंढा नागनाथ येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

हिंगोली सायबर सेलच्या पथकाने माध्यमिक आश्रम शाळा औंढा नागनाथ येथे जाऊन विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गास सायबर सेक्युरिटी तसेच सायबर फसवणुकी बाबत मार्गदर्शन केले.

यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणतेही अनोळखी एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाउनलोड करू नये, असे केल्यास आपल्या मोबाईल मधील डाटा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे आवाहन केले.

तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करू नका कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मैत्री स्वीकारू नका आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका, अशाप्रकारे सायबर बाबर माहिती दिली.

whatsapp तसेच फेसबुक येणारे अनोळखी महिलांचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका, याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते, अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेल हिंगोली येथे संपर्क करावा.

नागरिकांनी ऑनलाईन होणारे व्यवहार काळजीपूर्वक करावे तसेच आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे आवाहन हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी केले आहे.

Related posts

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

Santosh Awchar

औंढा नागनाथ तालुक्यात अतिवृष्टी ; बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणारच, ढोंगी पुढाऱ्यांपासून सावधान – आ.संतोष बांगर

Gajanan Jogdand

वादग्रस्त व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या एकास कळमनुरी पोलिसांनी उचलले! हिंदू – मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने ठेवले होते स्टेटस

Santosh Awchar

Leave a Comment