Marmik
Hingoli live क्राईम

हिंगोली येथे आणखी 8 टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 8 टवाळखोरांवर दामिनी पथकाने प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. या आधीही दामिनी पथकाने हिंगोली शहरात अशा टवाळखोरांवर कार्यवाही केलेली आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर तसेच विशेष करून शाळा महाविद्यालय तसेच शिकवणी वस्तीगृह या ठिकाणी व शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर, धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली व महिला तसेच बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली, महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस अंमलदार सरनाईक, सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक केली आहे.

सदरील दामिनी पथकाने 20 ते 26 मार्च यादरम्यान हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंगोली शहरात वरील महत्त्वाच्या एकूण 42 ठिकाणी भेटी दिल्या.

नमूद परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे व टवाळखोर असे एकूण 8 व्यक्तींवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केले आहे.

तसेच दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन नं. 8007000493 ची सेवा सुद्धा सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.

Related posts

कळमनुरीतील आठवडी बाजार गल्ली व जटाळवाडी येथील हातभट्टी दारू निर्मिती उध्वस्त! कळमनुरी पोलिसांची कार्यवाही

Santosh Awchar

प्रजासत्ताक दिन : गोकुळ विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम

Gajanan Jogdand

कापड दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच रचला खंडणीचा ‘प्लान’! मुख्य आरोपीस राजस्थान येथून अटक, व्यापाऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास

Santosh Awchar

Leave a Comment