Marmik
Hingoli live क्राईम

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तिघांवर दामिनी पथकाची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातील सार्वजनिक शांतता भंग करणारे व तवाळखोर अशा तिघांवर दामिनी पथकाने महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.

हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर व विशेष करून शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी वसतिगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर, धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली व महिला तसेच बालकांबाबत होणारे छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली, महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी कसकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे, महिला पोलिस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर दामिनी पथकाने मागील आठवड्यात 9 ते 14 जानेवारी या दरम्यान हिंगोली शहरात एकूण 49 ठिकाणी भेटी दिल्या.

नमूद परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे व टवाळखोर असे तीन इस्मानवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.

तसेच दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाईन 8007000493 ची सेवा ही सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.

Related posts

आपत्ती व्यवस्थापन: प्रत्येक गावातून निवडले जाणार भूकंप मित्र! प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकांनी तहसील कार्यालयात नोंदणी करावी

Santosh Awchar

स्वच्छतेसाठी जिल्ह्यात विशेष अभियान; 22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन 

Gajanan Jogdand

जांब तर्फे सिंदगी येथून 2.138 घनमीटर सागवान जप्त

Gajanan Jogdand

Leave a Comment