मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – श्रीखंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबाजार येथे दहा दिवसीय पर्युषण पर्वाची भव्य शोभायात्रेने सांगता करण्यात आली.या शोभायात्रा आचार्य विरागसागरजी महाराज यांच्या संघातील विकुंदनश्री माताजी यांच्या आर्शिवादाने पर्युषण पर्वाची सांगता करण्यात आली. सदर शोभायात्रा अत्यंत शिस्तबध्दतेने बॅन्ड पथकाच्या सुमधुर संगीतामध्ये जैन मंदिर राजाबाजार येथुन निघुन राजाबजार किरणा चावडी, शहागंज, संस्थान गणपती चौक व राजाबजार मार्गाने जैन मंदिरात विसर्जीत करण्यात आली.शोभायात्रेत पुरुषांनी पाढरे वस्त्र व स्त्रियांनी केशरी साड्य रिधान केल्या होत्या.
शोभायात्रेत भगवंताच्या पालखीपुढे डोक्यावर कुंभकळस घेवुन चालण्याचे भाग्य नयनादेवी प्रकाशचंद पाटनी- परिवार यांना मिळाला तर भगवंताचे इंद्र इंद्रानी होण्याचे भाग्य रीना समिर ठोले परिवार यांना मिळाला.
भंगवताला पालखी मध्ये विराजमान करण्याचे सौभाग्य मयुर सुरेश ठोले यांना मिळाला.तसेच या प्रसंगी भगवंताच्या पालखीची प्रथम दांडी चा भाग्य मिनादेवी राजेंद्र मयुर पाटनी दुसरी दांडी चे भाग्य दशॅन संगीता विजय सेठी तिसरी दांडी चे भाग्य जंयत पुष्कर प्रमोद पांडे चौथी दांडी चे भाग्य ताराबाई हिराचंद कासलीवाल विनोद श्रेणीक कासलीवाल यांना मिळाला. यांना शोभायात्रेत भगवान महावीरांची मुर्ती असलेल्या पालखीवर जागोजागी भाविकांनी पुष्पवृष्टी करत दर्शन घेतले.
भगवान महावीर का क्या संदेश जिओ और जिने दो पर्युषण महापर्व की जय, उपवास करने वालो की जय जय कार असा जयघोष करत शोभायात्रेत शेकडो महिला पुरâष लहान मुले सहभागी झाले होते.
तदनंतर सायंकाळी भगवान शांतीनाथाचा पंचामृत अभिषेक करण्यात आला.यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. महोत्सव यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत विश्श्वस्थ मंडळ व पर्युषण पर्व समिती व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
संध्याकाळी भगवंताच्या महाआरतीने सांगता करण्यात आली, अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानीं दिली आहे