मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत नमूद गुन्ह्यातील आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत विशेष मोहीम राबवून एकूण 11 लाख 71 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यातील आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याची ही पहिलीच मोहीम आहे.
या मोहिमेचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात स्तरावर मोहीम राबविण्याबाबत संबंधित सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.
या अनुषंगाने 30 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर गुन्ह्यात आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण बारा गुन्ह्यातील नगदी रक्कम 8 लाख 69 हजार रुपया सोन्या चांदीचे दागिने ज्यांची किंमत 50 हजार 250 रुपये तीन वाहने ज्यांची किंमत दोन लाख 10 हजार रुपये तीन मोबाईल फोन ज्यांची किंमत तीस हजार रुपये व इतर मुद्देमाल रुपये 12 हजार असा एकूण 11 लाख 71 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आला आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सा सर्व उपविभागीय पोलीस यांच्या मार्गदर्शना हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोह सुनील अंभोरे व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे मुद्देमाल मोहरर यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली.
भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येणार आहे.