मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गजानन जोगदंड :-
हिंगोली – तालुक्यात आतापर्यंत झालेल्या सततच्या पावसाने व अतिवृष्टीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली त्यानंतर पावसाने पिच्छा न सोडल्याने काही शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सेनगाव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आजघडीला सेनगाव तालुक्यातील शेतकरी बांधावाच्या हाताशी आलेला घास लहरी पावासाने हिरावून घेतला आहे. अती प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाले असून ह्यामुळे पहिलेच दुबार पेरणीने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी ओला दुष्काळाच्या गर्तेत सापडून पार कोलमडून गेलाय. आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता हे जुलमी सरकारही दुर्लक्षित करत आहे.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीसाठी ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. परंतु अद्याप असे झाले नाही. कुठेही पंचनामे करण्यात येत नाहीयेत. त्यामुळे कुंभकर्णी झोपेत, सत्ता सुंदरीत मग्न असलेल्या ह्या सरकार ला जागे करण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात तहसीलदार सेनगाव ह्यांच्या मार्फत ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे ही मागणी करण्यात आली.
या वेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह तालुकाप्रमुख संतोष देवकर, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख,युवासेना जिल्हासमन्वयक प्रविण महाजन,तालुकाप्रमुख जगदीश पाटील, दलीत आघाडी जिल्हाप्रमुख नंदु खिल्लारे, सर्कल प्रमुख बी. आर. नायक, पिणु पाटील, राजेश जाधव, कयुम पटेल, दिलीपराव कुंद्रगे, गंगाराम फटांगळे, सोंडू पाटील, दुष्यंत देशमुख, परमेश्वर राव गीते, गुजबाराव देशमुख, राहुल वाकले, स्वप्नील देशमुख, करण देशमुख, बद्रीनाथ कोटकर, हरिभाऊ काळे, राजू झाडे, धनाजी गीते, नामदेव हागे, नगरसेवक शिलांनद वाकले, वैभव देशमुख, निखिल देशमुख, संदीप कोकाटे, मंगेश पवार, गणेश रंजवे, सुदाम मुंढे, जीवन देशमुख,धनंजय देशमुख,अमर देशमुख, राम देवळे, गोपाल कबाडे,अमजद पठान, चेअरमन पोले,आवेज पठाण,महेश मुळे, विलास सुतार,हनुमान खणपटे तसेच शिवसेना,युवासेना चे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.