मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
20 ते 30 जून 2022 दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील करण्यात झाल्या होत्या. त्यामध्ये दुबार, तिबारही पेरण्या झाल्या ;मात्र करण्यापासून पाऊस सतत पडत राहिल्याने पिकांची वाढ झाली नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकात पाणी साचले असून शेती विकास सोबत जमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे अत्यल्प पिके शेतकऱ्यांच्या हाती येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर आमदार तानाजीराव मुटकुळे, भाजपा हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते, मिलिंद यंबल, नंदकुमार सवणेकर, कृष्णा ढोके, हमीद प्यारेवाले, हिम्मत रोडगे, रामप्रसाद रोडगे, जगन रोडगे, किसन रोडगे, डॉ. सुमंत सवणेकर, राजेंद्र पाटील. आशिष जयस्वाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.